12 December 2024 7:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML
x

ज्यांनी राज्यात भाजपचा वटवृक्ष केला तेच आज उन्हात: खडसे

जळगाव : ज्या नेत्यांनी राज्यात भाजपचा वटवृक्ष केला तेच आज उन्हात असल्याची खंत आज पुन्हां एकनाथ खडसें यांनी बोलून दाखवली. जळगाव जिल्हातील बोदवड इथं मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या कोणशिला प्रसंगी खडसे बोलत होते.

ज्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर लाठ्या – काठ्या खाल्या आणि राज्यात भाजपचा वटवृक्ष केला त्यांनाच आज उन्हात केलं आहे. जर माझ्यावरच्या आरोपांवर सरकारकडे सबळ पुरावे असतील तर त्यांनी ते जनतेसमोर ठेवावे असे ही ते उपस्थितांना संबोधताना म्हणाले.

काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर इथं काँग्रेस कार्यकर्ते राजू पाटील यांच्या एकसष्टीचा सोहळ्याला उपस्थिती लावली होती. त्यावेळी काँग्रेस चे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ही व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी ही एकनाथ खडसे यांनी अशीच खदखद व्यक्तं केली होती.

हॅशटॅग्स

#Ekanath Khadse(11)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x