12 December 2024 9:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

पुणे | भाजपचे 19 नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत | भाजपकडून खंडन

Pune, BJP corporators, left the party

पुणे, १९ जानेवारी: पुणे शहरातील 19 नगरसेवक भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत पुण्यात भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं होतं. भारतीय जनता पक्षाचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले होते. महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून मोठी इनकमिंग भारतीय जनता पक्षात झाली होती. परंतु यातीलच काही नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या चर्चांना अफवा असल्याचं सांगत खंडन केले आहे. भारतीय जनता पक्षाचा एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही, त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. कुणीतरी मुद्दाम अशाप्रकारे बातम्या पसरवत आहेत, ज्यात काही निष्पन्न होणार नसल्याचं बापट आणि मुळीक यांनी म्हटलं आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखी या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील भारतीय जनता पक्षाला कोणीही सोडणार नसल्याचे दावे वरिष्ठ नेत्यांनी केले होते. मात्र त्यानंतर देखील भारतीय जनता पक्षामध्ये राज्यभर गळती सुरु आहे. सध्या राज्यात महाविकास आघडीतील पक्षांची चलती आहे आणि सत्ता असल्याने शिवसेना तसेच राष्ट्रवादीत जोरदार प्रवेश होतं असल्याचं पाहायला मिळतंय. त्यात पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघांच्या निवडणुकीत पुण्यात भाजपाची बिकट अवस्था झाली होती. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला गळती लागण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली होती.

 

News English Summary: Discussions are rife in Pune’s political circles that 19 councilors from Pune are preparing to leave the Bharatiya Janata Party. In the last municipal elections, the Bharatiya Janata Party had achieved great success in Pune. As many as 98 BJP councilors were elected. Before the municipal elections, there was a big influx of NCP, Congress and Maharashtra Navnirman Sena into the Bharatiya Janata Party. But there is talk that some of these corporators are ready to leave the party.

News English Title: Pune BJP corporators may left the party soon news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x