19 April 2024 2:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर Reliance Power share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स पॉवर शेअर होल्ड करावा की बाहेर पडावे? Samvardhana Motherson Share Price | 18 पैशाच्या शेअरची जादू! गुंतवणुकदार झाले करोडपती, पुढेही फायद्याचा स्टॉक Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला Infosys Share Price | भरवशाचे टॉप 7 शेअर्स स्वस्त झाले, पण व्हॉल्यूम लाखोमध्ये, संयम राखल्यास मिळेल मल्टिबॅगर परतावा IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार? Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार?
x

पदवीधर निवडणुकीतील पराभव | पक्षातून प्रदेशाध्यक्ष हटाव आवाज येताच नेते स्वतःच्या मतदारसंघात

Maharashtra, BJP leader alert, Graduate constituency election

मुंबई, १६ डिसेंबर: राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून (results of 3 graduate and 2 teacher constituencies) राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्यानं भारतीय जनता पक्षाला जबरदस्त धक्का बसला होता. कारण, भारतीय जनता पक्षाला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ देखील गमवावा लागला होता. पदवीधरच्या या तिनही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरला होता.

त्यात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप सर्वच्या सर्व जागा जिंकणार असं म्हटलं होतं. मात्र धुळे-नंदुबारची एक जागा भाजप जिंकली ती देखील मूळ काँग्रेसमधील दिग्गज नेत्याच्या बळावर ज्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपात प्रवेश केला होता. त्यात भाजप पक्षाचं काहीच योगदान नव्हतं हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आता भाजप मधून वरिष्ठ पदाधिकारीच चंद्रकांत पाटील यांना हटविण्याची मागणी करू लागले होते.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा’ अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. विशेष म्हणजे यावेळी चक्क त्यांच्या बालेकिल्ल्यातूनच ही मागणी होती.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांनी चंद्रकांतदादांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या मागणीची पार्श्वभूमी सांगताना त्यांनी म्हटले होते की, चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा.

दरम्यान या नेत्यांनी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे यांच्याही राजीनाम्याची मागणी केली होती. पुण्यात येऊन दंड थोपटनार्‍या पाटील यांना कोल्हापुरातून म्हणजेच आपल्या होम पीचवरच आव्हान उभे केले होते. पाटील यांनीही निवडणूक गांभीर्याने घेतली नसल्याने भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला, असा आरोप कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांनी केला होता. त्यामुळे यावर चंद्रकांत पाटील काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

या पार्श्वभूमीवर आगामी नागपूर महापालिका निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्षाने आता पासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस मुक्काम ठोकणार असून संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीच्या तयारीवर भर देणार आहेत.

पदवीधर निवडणूकीतील पराभवानंतर आता भारतीय जनता पक्षाने सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या ताकदीचा अंदाज आल्याने पुढच्या सर्व निवडणुकांचा भारतीय जनता पक्षाने धसका घेतला आहे. त्यामुळेच नागपूर महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं तयारी सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस दर आठवड्यातील दोन दिवस नागपुरात मुक्कामी असणार आहेत. नागपूर महानगरपालिका निवडणूकीची पूर्व तयारी आणि विदर्भातील पक्षबांधीसाठी फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आहेत. “भाजप नेहमीच निवडणूकीच्या तयारीत असते, नागपूर मनपा पुन्हा जिंकणार आणि विधानसभा निवडणूक केव्हाही होवो, विदर्भातील ६२ पैकी ५० पेक्षा जास्त जागा जिंकू,” असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

 

News English Summary: After the defeat in the graduate elections, the Bharatiya Janata Party has now started taking cautious steps. The Bharatiya Janata Party (BJP) has pushed for all the forthcoming elections as the strength of the Mahavikas Alliance has been gauged on the occasion of this election. That is why the Bharatiya Janata Party has started preparations for the Nagpur Municipal Corporation elections. As part of this, Leader of the Opposition Devendra Fadnavis will be staying in Nagpur two days a week. Fadnavis is in action mode for pre-election preparations for Nagpur Municipal Corporation and party affiliation in Vidarbha. “The BJP is always ready for elections. Nagpur Municipal Corporation will win again and whenever the assembly elections are held, we will win more than 50 seats out of 62 in Vidarbha,” said Bharatiya Janata Party state general secretary Chandrasekhar Bavankule.

News English Title: Maharashtra BJP leader alert after graduate constituency election failure news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x