28 April 2024 5:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

मनसेचा कृषी कायद्याला पाठिंबा? | मोदी सरकारला मागे न हटण्याची या नेत्याची थेट मागणी

Raj Thackeray, MNS party, new agriculture law, farmers protest

पुणे, ७ डिसेंबर: नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंद दरम्यान ८ तारखेला भारत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंद राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. सिंघू सीमेवर जय किसान चळवळीतील योगेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत बंद दरम्यान 8 तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत भारत बंद ठेवण्यात येणार आहे.

या बंदवेळी दुपारी ३ वाजेपर्यंत देशभर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. यामुळे दूध-फळ-भाज्यांच्या वाहतुकीवरही बंदी असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाहसोहळे आणि आपत्कालीन सेवांवर कोणतंही बंधन असणार नाही अशी माहिती योगेंद्र यादव यांनी दिली आहे. खरंतर, शेतकऱ्यांच्या या भारत बंदला सर्वच स्तरातून पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे 8 तारखेला म्हणजेच उद्या सर्व व्यवहार आणि वाहतूक ठप्प राहिल असं बोललं जात आहे.

एकाबाजूला मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी आणि देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांनी जाहीर पाठिंबा दिलेला असताना राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला अपवाद ठरण्याची शक्यता आहे. देश आणि जगभरातून शेतकऱ्यांना मागे न हटण्याचं आवाहन होतं असताना मनसेने थेट मोदी सरकारला मागे न हटण्याचं आवाहन केलं आहे.

यासंदर्भात राज ठाकरे यांचे विश्वासू नेते अनिल शिदोरे यांनी ट्विट करून एकप्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची भूमिकाच मांडल्याचे म्हटलं जातंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या नेत्यानी या कायद्याला समर्थन दर्शवल्याचे सध्या चित्र आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करून शेतकरी आंदोलनाबद्दल आपली भूमिका मांडली आहे. त्यात त्यांनी ‘केंद्र सरकारने निर्णय मागे घेतला तर आपण दहा वर्षे मागे जाऊ’ असे मत अनिल शिदोरे यांनी व्यक्त केले आहे.

नेमकं काय म्हणाले अनिल शिदोरे?
आपण वर्षानुवर्ष पाहिले की कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी हीच शेतकरी वर्गावर अन्याय करते आहे. त्याचा बिमोड करायचा म्हणून संसदेत तीन कृषी विषयक कायदे मंजूर झाले, आता इथून सरकारने माघार घेतली तर शेतकरी पुन्हा भ्रष्टाचारी व्यवस्थेत भरडला जाईल.. सरकारने माघार घेऊ नये, अशी मागणी शिदोरे यांनी केली आहे.

तसेच, ‘शेतीचं भलं खुल्या बाजाराशी जोडले जाण्यात आहे. ती दिशा आहे. ज्या कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन चालू आहे, ते कायदे त्याच दिशेने जाणारे आहेत. त्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत काही सुधारणा करता येतील. मात्र आज माघार घेतली तर देशातील एकूण आर्थिक सुधारणांबाबत आपण दहा वर्ष मागे जाऊ’ असे मत देखील अनिल शिदोरे यांनी व्यक्त केले.

त्याचबरोबर शरद पवार यांचे एपीएमसीला पाठिंबा देणारे पत्र समोर आले आहे. याचा धागा पकडून शिदोरे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. ”राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ह्यांनी त्यांच्या “लोक माझे सांगाती..” ह्या पुस्तकात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नियंत्रणामुळे कसा अन्याय होतो आहे आणि हे नियंत्रण काढले पाहिजे असे म्हटले असल्याचे समजले. मी पुस्तक वाचलेले नाही पण हे खरं आहे का? असा थेट सवाल शिदोरे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारला आहे.

 

News English Summary: It is said that Raj Thackeray’s loyal leader Anil Shidore tweeted and in a way presented the role of Maharashtra Navnirman Sena. Maharashtra Navnirman Sena leaders have expressed support for the law. Maharashtra Navnirman Sena leader Anil Shidore has posted on social media about the farmers’ movement. In it, Anil Shidore has expressed the view that if the central government reverses the decision, we will go back ten years.

News English Title: Does Raj Thackeray’s MNS party support new agriculture law as MNS leader Anil Shidore mentioned News updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x