17 May 2021 2:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोना रुग्ण | ४,१०६ रुग्णांचा मृत्यू हट्टी मोदी सरकार वैज्ञानिकांचे सल्ले देखील ऐकत नाहीत | डॉ. जमील यांचा कोरोना सल्लागार गट प्रमुख पदाचा राजीनामा DRDO कोरोना औषध 2DG तयार | रुग्णांकडे लवकरात लवकर पोहोचविण्यापेक्षा लॉन्च इव्हेंटला महत्व तौते चक्रीवादळ, प्रशासन सतर्क | रायगडमध्ये 25200 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
x

Bharat Bandh | शेतकरी संघटनांचे आज देशव्यापी आंदोलन

Bharat Bandh, Nationwide farmers strike, Farmers Bills, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, २५ सप्टेंबर : संसदेत विरोधकांचा विरोध डावलून सविस्तर चर्चा न करताच संमत करण्यात आलेली कृषी विधेयके मोदी सरकारच्या अंगाशी आलेली दिसत आहेत. या तीन कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी आज भारत बंद आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनात भारतीय शेतकरी युनियनसहीत वेगवेगळ्या शेतकरी संघटना सामील झाल्या आहेत. देशभर चक्का जाम करण्याची घोषणा करण्यात आलीय. यामध्ये ३१ संघटनांचा समावेश आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

शेतकरी संघटनांना काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, अकाली दल, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस यासहीत अनेक पक्षांकडून पाठिंबा मिळालाय. विधेयकाचा निषेध करत मोदी मंत्रिमंडळातील मंत्री आणि अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवलाय. या विधेयकाचा सर्वात जास्त विरोध पंजाब आणि हरियाणामध्ये दिसून येतोय. पंजाबमध्ये गुरुवारपासून तीन दिवसांचं रेल रोको आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावरच ठाण मांडून विधेयक परत घेण्याची मागणी केलीय.

काँग्रेसकडूनही या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. शेतकऱ्यांविरोधात आणलेल्या या विधेयकावर काँग्रेसने पुढील 2 महिने जनआंदोलन पुकारण्याची घोषणा केली आहे. मंगळवारीही पंजाब-हरियाणातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत या विधेयकाला विरोध केला. पंजाबमधील शेतकऱ्यांनी गुरुवारी तीन दिवसांचे रेल रोको आंदोलन सुरू केलं आहे. त्यानंतर अनेक रेल्वे गाड्या स्थगित करण्यात आल्या. या आंदोलनमुळे 24 ते 26 सप्टेंबरदरम्यान विशेष गाड्यांच्या 14 जोड्या धावणार नाहीत, असेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रातही हे आंदोलन तापण्यास सुरुवात झाली आहे. केंद्राने बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारी प्रक्रिया पुढे रेटली आहे. केंद्राची ही भूमिका शेती, माती व शेतकऱ्यांशी द्रोह करणारी आहे. केंद्र सरकारचे जमीन अधिग्रहण बिलात बदल करण्याचे प्रयत्न ज्याप्रकारे उधळण्यात आले त्या प्रकारे कृषी कायद्याचा अंमल करण्याचे सरकारचे प्रयत्न शेतकरीच उधळून लावतील, असे अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले. त्यामुळे आता भाजप या सगळ्याला कशाप्रकारे सामोरे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

News English Summary: All India Farmers Union (AIFU), Bharatiya Kisan Union (BKU), All India Kisan Mahasangh (AIKM), and All India Kisan Sangharsh Coordination Committee (AIKSCC) announced a nationwide bandh. Farmers’ bodies from Karnataka, Tamil Nadu and Maharashtra have also called for a shutdown.

News English Title: Bharat Bandh Nationwide farmers strike today Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Farmer(108)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x