26 May 2022 7:50 PM
अँप डाउनलोड

Amla Health Benefits | आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो आवळा | हे आहे मोठे फायदे

Amla Health Benefits

मुंबई, २९ सप्टेंबर | आवळा हा चवीला तुरट आंबट असला तरी तो आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर (Amla Health Benefits) असतो. आवळ्यापासून पेठा, सुपारी, लोणचं, आवळा पावडर, आवळा कॅण्डी असे अनेक पदार्थ बनवले जातात. पित्तापासून ते हाडांच्या मजबुती अशा अनेक व्याधीवर आवळा गुणकारी ठरतो. याशिवाय आवळ्याच्या सेवनाने नेत्रदृष्टी शाबूत राहते आणि आतड्यांची कार्यशक्ती देखील वाढते. आवळा हा शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतो. त्यामुळे त्याला बहुगुणी देखील म्हटले जाते.

Although Amla is astringent and sour in taste, it is very beneficial for health (Amla Health Benefits). Amla is beneficial in many ailments ranging from bile to bone strength :

Amla-Health-Benefits

व्हिटॅमिन सी’ने भरपूर (Vitamin C):
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) घटक असतो. त्यामुळे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज आवळ्याचं सेवन करणं उपयुक्त ठरते. आवळा पावडर, आवळा लोणचं असे पदार्थ तयार करून तुम्ही अनेक देवस सेवन करू शकता. रोज सकाळी आवळ्याचे सेवन केल्याने पचनक्रिया देखील सुधारते. आवळा हा उपाशी पोटी खाल्ला तर अधिक लाभदायी ठरतो.

आवळा खाण्याचे फायदे (Benefits of eating amla)
* आवळा व्हिटॅमिन सी (Vitamin C) ने भरपूर असतो. त्यामुळे आवळ्याचे सेवन केल्याने त्वचेवरील मुरूम, फोड या समस्या दूर होण्यास मदत होते. रोज आवळ्याचे सेवन केल्यटाने त्वचा तजेलदार बनते.

* गर्भवती महिलांसाठी देखील आवळा लाभदायी ठरतो. गर्भवती महिलांनी आवळ्याचे सेवन केल्यास बाळ आणि आईचे पोषण उत्तम होते.

* पोट निरोगी ठेवण्यासाठी देखील आवळा फायदेशीर ठरतो. मोरावळा खाल्ल्यानं पोट साफ राहाते. पित्ताचा त्रास देखील दूर होतो. तुम्हाला अशक्तपणा जणवत असेल तर आवळा खाल्यास दूर होऊ शकतो. मधुमेह असणाऱ्या रूग्णांनी नियमित मोरावळा खाणे लाभदायी ठरू शकते.

* दातांच्या आरोग्यासाठी देखील आवळा उपयुक्त आहे. तोंड येणे, हिरड्यांमधून रक्त येणे अशा आजारांवर आवळा गुणकारी आहे. आवळा खाल्ल्याने त्वचेचे आजार देखील उद्भवत नाहीत.

* मेंदूसाठी देखील आवळा उपयुक्त ठरतो. नियमित आवळ्याचे सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढते आणि बुद्धी चांगली राहण्यास मदत होते.

* केसांसाठी देखील आवळा फायदेशीर ठरतो. मुलायम आणि लांब केसांसाठी आवळ्याची पावडर तेलात उकळून लावावी. केसांना पोषण मिळण्यासाठी रोज एका आवळ्याचं सेवन करणे लाभदायी ठरते.

* हाडांच्या मजबुतीसाठी आणि पोटाच्या विकारांसाठी कोमट पाण्यात आवळा पावडर घालून रोज सकाळी सेवन करा. याशिवाय आवळा पावडर भिजवून ती केसांनाही लावली तर केस मृदू आणि लांब होतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Amla Health Benefits in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x