28 March 2023 8:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Credit Card | एसबीआय बँक क्रेडिट कार्डचे नियम बदलले, हे लक्षात ठेवा आणि फायद्यात राहा IRCTC Railway Ticket Discount | खुशखबर! वरिष्ठ नागरिक रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, तिकीट मध्ये पुन्हा सूट मिळणार? Facial Cleansing | त्वचा टॅन होते आणि त्वचेवर धूळ बसते, पार्लरमध्ये न जाता 'या' स्टेप्सने घरीच तुमचा चेहरा करा स्वच्छ Max Cinema Hall | हा छोटा मिनी प्रोजेक्टर घरात चित्रपट गृह आणि क्रिकेट स्टेडियमचा आनंद देतोय, किंमत आणि फीचर्समुळे प्रचंड मागणी IRCTC Railway Ticket | रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, प्रवासापूर्वी हे लक्षात ठेवा अन्यथा तुम्हाला सीट मिळणार नाही Saving Account | एका व्यक्तीला बँक सेविंग अकाऊंटची मर्यादा किती आहे? हे नियम लक्षात ठेवा अन्यथा नुकसान Minimum Salary of EPF | तुमचा किमान पगार किती आहे? कारण पेन्शनची रक्कम वाढणार, नवा प्लॅन लक्षात ठेवा
x

कृषी कायदे रद्द न करण्यामागची मोदी सरकारने अडचण सांगावी | मग मी वचन देतो....

Farmers Protest, Rakesh Tikait

गाझियाबाद, ३१ जानेवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल (30 जानेवारी) सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारचा कृषी कायदा आणि शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार कृषी कायद्याच्या भूमिकेवर ठाम आहे. सरकारला कृषी कायद्यांवर शेतकऱ्यांशी चर्चा करायची आहे, असे मोदींनी स्पष्ट केले. तसेच विरोधकांनीही शेतकऱ्यांशी याबाबत चर्चा करावी, असे आवाहनही मोदींनी केले होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काँग्रेस नेता गुलाब नबी आझाद, TMC चे सुदीप बंद्योपाध्याय, शिवसेना खासदार विनायक राऊत, SAD चे बलविंदर सिंह भांडेर हे नेते उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा केली. तसेच आंदोलक शेतकऱ्यांवरचे गुन्हे परत घ्या, अशी मागणी करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांपासून एक कॉल दूर असल्याचे सांगितले. आज देखील कृषीमंत्र्यांनी दिलेली ऑफर खुली असल्याचे सांगत शेतकरी नेत्यांना आवाहन केले. यावर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारने कायदे रद्द न करण्यामागची अडचण सांगावी, मी वचन देतो सरकारची मान जगासमोर झुकू देणार नाही, असा शब्दच देऊन टाकला.

ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसेवरून शेतकरी आंदोलनाची ताकद कमी होऊ लागली होती. परंतु, टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर गाझीपूरसह अन्य सीमांवर शेतकऱ्यांची नव्या दमाची फौज येऊ लागली आहे. काल रात्रीपर्यंत ५०००० हून अधिक शेतकरी गाझीपूरला येऊन पोहोचले आहेत. यामुळे टिकैत यांना देखील स्फुरन चढले आहे. सरकारची अशी कोणती अडचण आहे की नवीन कृषी कायदे रद्द करण्यास तयार नाहीय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi said at a meeting of all-party leaders that a call was far from the farmers. He appealed to the farmers leaders saying that the offer made by the Agriculture Minister is open even today. On this, Rakesh Tikait, leader of the Indian Farmers’ Union, said that the central government should not repeal the law, I promise the government will not bow down to the world.

News English Title: I promise the government will not bow down to the world said farmers leader Rakesh Tikait news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x