14 December 2024 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या
x

सर्वाधिक साक्षरता प्रमाण असणाऱ्या राज्यातील जनतेची राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पसंती

Kerala peoples, Rahul Gandhi, Prime Minister of India

नवी दिल्ली, ०९ मार्च: देशात पाच राज्यांच्या निवडणुकाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे आणि राजकीय पक्ष प्रचाराला देखील लागले आहेत. त्यासाठीच्या मोठ्या प्रमाणावर सभा घेण्यास सुरुवात झाली आहे. संबंधित राज्यातील विद्यमान सत्ताधारी, विरोधकांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र मतदान होण्यापूर्वी करण्यात आलेल्या सर्व्हेत आकडे समोर आली होती. त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या पुन्हा ममता बॅनर्जी यांचीच जादू चालणार असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे आसाममध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार येऊ शकतं.

केरळात मात्र भाजप गिणतीत नसल्याचं म्हटलं जातंय. त्यात भाजपाकडे मुख्यमंत्री पदापासून ते सामान्य उमेदवाराची कमतरता असल्याने जे समोर आले त्यांच्या नावाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तर तामिळनाडूत AIADMK भरोसे निवडणूक लढवली जात असली तरी तेथे देखील सत्तांतर होऊन DMK ची सत्ता येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दुसरीकडे एका सर्वेक्षणात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या कामावर बहुतांश राज्यांतील जनतेनं समाधान व्यक्त केलं आहे. मात्र टाईम्स नाऊ आणि सी-व्होटरनं केरळमध्ये केलेल्या सर्वेक्षणात काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना धोबीपछाड केला आहे. पंतप्रधान पदासाठी कोणाला सर्वाधिक पसंती द्याल, असा प्रश्न सर्वेक्षणात सहभागी झालेल्या केरळमधील रहिवाशांना विचारण्यात आला. त्यावर ५५.८४ टक्के लोकांनी राहुल गांधी असं उत्तर दिलं. तर नरेंद्र मोदींच्या नावाला पसंती देणाऱ्यांचं प्रमाण ३१.९५ टक्के इतकं होतं. (Kerala peoples want to see Rahul Gandhi as Prime Minister of India says survey)

 

News English Summary: On the other hand, in a survey, people in most states have expressed satisfaction with Narendra Modi’s work as Prime Minister. However, in a poll conducted by Times Now and C-Voter in Kerala, Congress MP Rahul Gandhi has lashed out at Prime Minister Modi. Residents of Kerala who took part in the survey were asked who would be the most preferred candidate for the PM’s job. 55.84 per cent people answered as Rahul Gandhi. The proportion of people who like Narendra Modi’s name was 31.95 per cent.

News English Title: Kerala peoples want to see Rahul Gandhi as Prime Minister of India says survey news updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x