2 May 2024 12:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

विवाहबाह्य संबंध | केवळ मार्केटिंगसाठी भारतीय महिलांची बदनामी | डेटिंग अ‍ॅपवर बंदीची मागणी

MLA Manisha Kayande, Drew attention, Gliden survey

मुंबई, ०९ मार्च: जागतिक महिला दिनी ग्लिडेन या फ्रेंच डेटिंग अ‍ॅपने महिलांच्या डेटिंगबद्दलचा एक अहवाल प्रसिद्ध केला. काळाच्या ओघात लोकांची विचारसरणीही बदलत आहे. लोक आता सेक्स या गोष्टीला त्यांची गरज म्हणून स्वीकारत आहेत. अलीकडील काही सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, लोक आपल्या सेक्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लग्नानंतरही विश्वासघात करण्यास धजावत नाहीत. याबाबत ग्लोबल एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अ‍ॅप, ग्लेडेनच्या (Gleeden) सर्वेक्षणात काही धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. या संशोधनानुसार, 43 टक्के पुरुषांच्या तुलनेत 53 टक्के भारतीय विवाहित महिलांनी हे मान्य केले आहे की, त्यांनी लग्नानंतरी इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत.

याबाबत ग्लेडेनचे मार्केटिंग संचालक म्हणाले ‘भारतीय स्त्रिया आता व्यभिचाराबद्दल खुल्या विचारांच्या झाल्या आहेत. खासकरून जेव्हा यात रोमान्सचा सहभाग असतो.’ हे ऑनलाइन सर्वेक्षण दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद या शहरांतील 1500 लोकांद्वारे केले आहे. या सर्वेक्षणात असे आढळले आहे की, विवाहित भारतीय महिला या विवाहित पुरुषांपेक्षा विवाहबाह्य संबंध अधिक ठेवतात. या अभ्यासानुसार, 26 टक्के पुरुषांच्या तुलनेत 40 टक्के विवाहित स्त्रिया इतर पुरुषांशी नियमित शारीरिक संबंध ठेवतात.

भारतातील जवळजवळ 50 टक्के विवाहित लोकांनी हे मान्य केले आहे की, त्यांनी आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त इतरांशी शारीरिक संबंध ठेवले आहेत. 48 टक्के भारतीयांचा असा विश्वास आहे की, एकाच वेळी दोन लोकांवर प्रेम केले जाऊ शकते. त्याच वेळी, 46 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, एखाद्याशी प्रेमसंबंध असतानाही व्यभिचार केला जाऊ शकतो. हेच कारण आहे की बहुतेक भारतीय लोक आपल्या जोडीदाराच्या बाहेरच्या अफेयरबद्दल समजल्यावरही त्याला माफ करतात. दुसरीकडे त्याच वेळी, 40 टक्के लोकांनी सांगितले आहे की, फसवणूक केल्याबद्दल क्षमा करणे हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते.

दरम्यान, ग्लिडेन या डेटिंग अ‍ॅपच्या अहवालावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. विधान परिषदेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

महिला दिनी विधान परिषदेत बोलताना आमदार मनिषा कायंदे यांनी या ग्लिडेनच्या सर्वेकडे लक्ष वेधलं. त्या म्हणाल्या,”आज महिला दिन आहे आणि आपण भारतीय महिलांच्या यशोगाथा वाचत असतो, ऐकत असतो. त्याचा उहापोह करतो आणि नेमकं अशाच दिवशी एक फ्रेंच अ‍ॅप आहे, ग्लिडेन नावाचं. या अ‍ॅपने असं म्हटलं आहे की, त्यांनी ६० कोटी लोकांचा सर्वे केला आहे. त्यात भारतीय महिलांचा देखील सर्वे केला आहे. मूळात हा अ‍ॅप एक डेटिंग अ‍ॅप आहे. ६० टक्के महिलांपैकी ४८ टक्के महिला विवाहबाह्य संबंध ठेवतात. भारतीय महिलांना बदनाम करण्याचा हा प्रकार आहे,” असं कायंदे म्हणाल्या. शेतकरी, कष्टकरी महिला आहेत. कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या महिला आहेत. नेमकं महिला दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी जो काही तथाकथित निष्कर्ष मांडला आहे. तो घृणास्पद आणि निंदनीय आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

केवळ मार्केटिंग करण्यासाठी त्यांनी हे केलं असून, त्यासाठी भारतीय महिलांची बदनामी करणं निंदनीय आहे. चूल मूल सांभाळून महिला घराबाहेर पडतात. या अ‍ॅपवर बंदी आणावी, तसे निर्देश द्यावे,” अशी मागणी कायंदे यांनी केली आहे. त्यावर सभापती रामराजे निंबाळकर यांनी या अ‍ॅपवर बंदी घालण्यासंदर्भात केंद्राशी चर्चा करावी असे निर्देश राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना दिले आहेत.

 

News English Summary: Speaking in the Legislative Council on Women’s Day, MLA Manisha Kayande drew attention to this Gliden survey. She said, “Today is Women’s Day and we are reading and listening to the success stories of Indian women. There is a French app called Gliden on the same day. The app says it has surveyed 600 million people. It also surveyed Indian women. This app is basically a dating app. Out of 60 per cent women, 48 per cent have extramarital affairs.

News English Title: MLA Manisha Kayande drew attention to this Gliden survey news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x