25 April 2024 9:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

Hathras gangrape | पीडितेच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये बलात्काराचा उल्लेखच नाही

Autopsy Report, Hathras Gang Rape, Balrampur Gangrape, Uttar Pradesh

लखनऊ, १ ऑक्टोबर: उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दिल्ली येथील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये (Safdarjung Hospital Delhi) उपचार सुरु असतानाच पीडितेची प्राणज्योत मालवली. आता पीडितेचा पोस्टमार्टम रिपोर्ट (Postmortem Report) समोर आला आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सफदरजंग हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या पॅनलद्वारा जाहीर करण्यात आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, पीडितेचा अनेकदा गळा आवळण्यात आला होता. गळ्याचं हाड मोडल्यामुळे पीडितेचा मृत्यू झाला. अनेकदा गळा आवळल्यामुळे पीडित तरुणीच्या गळ्याचं हाड मोडलं असावं. गळ्यावर अनेक जखमाही आढळल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. धक्कादायक म्हणजे, पीडितेवर बलात्कार झाला होता, असा रिपोर्टमध्ये कुठेही उल्लेख नाही.

दुसरीकडे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेच्या मणक्याला फ्रॅक्चर झाला होता. तसंच तिचा गळा दाबण्यात आला होता. महत्त्वाचं म्हणजे ‘अंतिम निदान’मध्ये बलात्कार झाला आहे याला दुजोरा देण्यात आलेला नाही. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयानेच शविवच्छेदन अहवाल तयार केला आहे. उपचारासाठी पीडितेला अलिगड रुग्णालयातून सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. शवविच्छेदन अहवालानुसार, मणक्याला फ्रॅक्चर झाला असताना रक्तस्त्रावदेखील झाला होता.

यासोबत पीडितेच्या गळ्यावर आढलेल्या खुणा तिचा गळा दाबल्याचं स्पष्ट करत असल्याचंही अहवालात नमूद आहे. पीडितेचा गळा दाबवण्यात आला असला तरी त्यामुळे मृत्यू झाला नसल्याचाही अहवालात उल्लेख आहे. व्हिसेराच्या आधारे मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं अहवालात सांगण्यात आलं आहे. व्हिसेरा जपून ठेवण्यात आलं असून इतर महत्त्वाचे नमुने तपास अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आल्याचं रुग्णालयाने सांगितलं आहे.

गळ्यावर असणाऱ्या जखमांमुळे तरुणीला अर्धांगवायूचा झटका आला आणि श्वसनात अडथळा निर्माण होत होता असा कुटुंबाचा दावा आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी बलात्काराला दुजोरा देण्यासाठी आपण फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत असल्याचं म्हटलं आहे.

 

News English Summary: The young woman from Uttar Pradesh’s Hathras, who died days after being gang raped and tortured, was strangled, brutalised and suffered cervical spine injury, her autopsy report has said. The “final diagnosis” does not mention rape but the report refers to tears in her private parts. The woman died of “injury to the cervical spine by indirect blunt trauma,” says the report accessed from the Delhi hospital where the 20-year-old died on Tuesday.

News English Title: Autopsy Report Confirms Hathras Gang Rape Victim Strangled Had Cervical Spine Injury Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x