30 November 2022 12:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Mutual Fund | LIC शेअर्सने पैसे बुडवले, पण LIC म्युच्युअल फंडाच्या या योजना 100% पर्यंत परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा Multibagger Stocks | पैसा कोणाला नको! हे 20 शेअर्स 530 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, स्टॉक लिस्ट पहा, खरेदी करणार? Horoscope Today | 30 नोव्हेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 30 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Quick Money Share | काय सांगता! या टॉप 5 शेअर्सनी 5 दिवसात 53 पर्यंत परतावा दिला, शेअर्स नोट करा, पैसा वाढवा Gold Price Today | आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील लेटेस्ट दर तपासून घ्या SBI Recruitment 2022 | एसबीआय बँकेत (मुंबई) भरती, ऑनलाईन अर्ज करा
x

योगी दुसऱ्यांना मार्गदर्शन करतात | पहिल्यांदा स्वत:च्या राज्यात लक्ष घालावं

Home minister Anil Deshmukh, CM Yogi Adityanath, Hathras Gangrape, Balrampur Gangrape

मुंबई, १ ऑक्टोबर: “योगी आदित्यनाथ बाकी राज्याच्या लोकांना मार्गदर्शन करत असतात. आज त्यांच्याच राज्यामध्ये जंगलराज आहे. त्यांनी पहिल्यांदा स्वत:च्या राज्यात लक्ष घालावं”, असा सणसणीत टोला महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हाथरस प्रकरणावरून योगींना लगावला आहे. (Home Minister Anil Deshmukh Slam Yogi Adityanath over Hathras Rape Case)

“पीडित मुलीवर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिची जीभ कापण्यात आली , तसंच तिच्या पाठीचा कणा देखील त्यांनी मोडला. 10 दिवस तिचे कुटुंबीय एफआयआर देण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांचा एफआयआर देखील घेतला गेला नाही. योगी आदित्यनाथ बाकी राज्याच्या लोकांना मार्गदर्शन करत असतात आज त्यांच्या राज्यामध्ये जंगलराज आहेत. त्यांनी पहिल्यांदा स्वत:च्या राज्यात लक्ष घालावं”, असा निशाणा गृहमंत्र्यांनी योगींवर साधला.

काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, या बलात्कारपीडित मुलीचा मृत्यू झाला याची बातमी तिच्या वडिलांना कळविण्यात आली, त्यावेळी नेमकी मी त्यांच्याशी फोनवर बोलत होते. ही मुलगी व तिच्या कुटुंबियांना संरक्षण द्यायचे सोडून योगी सरकारने त्यांच्या मानवी हक्कांवरच गदा आणण्याचे काम केले आहे. योगी यांनी राजीनामा द्यावा.

उत्तरप्रदेशमध्ये आता कायद्याचं राज्य राहिलं नाही तर योगींच्या खास लोकांचं राज्य आलं आहे. योगी हे महाराज आहेत परंतु राज्य राजासारखं चालवत असून हे लोकशाहीला घातक आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समाचार घेतला आहे.

 

News English Summary: We saw Uttar Pradesh CM Yogi Adityanth giving advice to others during the past some months. I suggest him to take care of his state & take strict action against ‘jungle raj’ prevailing there said Maharashtra Home Minister Anil Deshmukh on rape incidents in UP.

News English Title: Home Minister Anil Deshmukh Slam CM Yogi Adityanath over Hathras Rape Case Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x