26 April 2024 7:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

जगातील सर्वात मोठी लोकशाही संकटात | कमला हॅरिस यांच्या भाचीचं शेतकऱ्यांच्या समर्थनात वक्तव्य

Farmer Protest, Meena Harris, Support Farmer

नवी दिल्ली, ०३ फेब्रुवारी: मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी दिल्लीमध्ये शिरु नयेत म्हणून दिल्लीच्या सीमांवर म्हणजेच सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तिन्ही ठिकाणी चार ते पाच फूट उंचीच्या सुरक्षा भिंती दिल्ली पोलिसांनी उभारल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गांवर काँक्रीटचं बांधकाम करत या भिंती उभारुन दिल्ली पोलिसांनी संयुक्त किसान मोर्चामधील आंदोलकांनी दिल्लीमध्ये घुसू नये म्हणून ही नाकाबंदी केलीय. या भिंतीच्या पलीकडेही दीड किलोमीटरपर्यंत वेगवेगळे अडथळे उभारत बॅरिकेट्, खिळे, लोखंडी खांब, तारा टाकून प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

दरम्यान, एकूण जगभरातून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्या भाचीनंही ट्विट करून शेतकऱ्यांविरुद्ध होत असलेल्या कारवाईवर ट्विट केलं आहे. मीना हॅरिस हिने सर्वांना याविरुद्ध आवाज उठवण्याचं आवानही केलं आहे. जगभरातून एकावर एक मोठ्या व्यक्ती समाज माध्यमांवरून पाठिंबा देत आहेत.

कमला हॅरिस यांची भाची मीना हरिस हिने ट्विट करत शेतकरी आंदोलनावर भूमिका मांडली आहे. हा केवळ योगायोग नाही की, जगातील सर्वात जुन्या लोकशाहीवर एका महिन्यापूर्वी हल्ला झाला. आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली लोकशाही संकटात आहे. हे एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे. भारतात शेतकरी आंदोलकांविरुद्ध पोलिसांचा वापर आणि इंटरनेटवर बंदीविरुद्ध आपल्या सर्वांनी आवाज उठवायला हवा,” असं ट्विट मीना हॅरिस यांनी केलं आहे. मीना हॅरिस हिने पॉपस्टार रिहानाने केलेलं ट्विटही रिट्विट केलं आहे.

 

New English Summary: Kamala Harris ‘niece Meena Harris has tweeted about the role of the farmers’ movement. It is no coincidence that the world’s oldest democracy was attacked a month ago. Now the world’s most populous democracy is in crisis. It is interconnected. We should all speak out against the use of police against farmers’ protests in India and the ban on the internet, “tweeted Meena Harris. Meena Harris also retweeted a tweet from popstar Rihanna.

News English Title: Farmer Protest Meena Harris Appeal To Support Farmer Protest news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x