3 May 2024 3:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

जेडीएस - काँग्रेस युती, कर्नाटक लोकसभा निवडणुकीत भाजपला धोका ?

कर्नाटक : २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत जेडीएस – काँग्रेस युती उदयास येऊन भाजपला मोठा धोका उद्भवण्याची शक्यता राजकीय जाणकार बोलून दाखवत आहेत ते सुद्धा मागील आणि सध्याच्या उपलब्ध आकडेवारीनुसार.

कारण जर आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व देवेगौडा यांचा जनता दल सेक्यूलर हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर भाजपाला केवळ ६ जागांवरच विजय मिळेल असं सध्याची आकडेवारी सांगते. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला १७ जागांवर विजय मिळाला होता.

कालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस आणि जनता दल सेक्यूलर या दोन पक्षांची जवळीक वाढल्याचे चित्र असून त्याचे रूपांतर येत्या लोकसभा निवडणुकीत युतीत होण्याची शक्यता आहे. परंतु ह्या दोन पक्षांची युतीच भाजपसाठी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत धोक्याची घंटा ठरू शकते. काँग्रेस आणि जनता दल सेक्यूलर यांची युती झाल्यास भाजपच्या वाट्याला कर्नाटक लोकसभेत केवळ ६ जागाच विजय मिळवता येईल हे आकडेवारी सांगते.

काल हाती आलेल्या विधानसभेच्या निकालाच्या निकषावर काही वृत्त पत्रांनी भाजपाला २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळू शकतात याचा एक अंदाज घेतला तेव्हा ही आकडेवारी समोर आली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यामुळे २०१९ मध्ये जर जेडीएस आणि काँग्रेस एकत्र आले तर मतांचे विभाजन होणार नाही आणि त्याचा प्रचंड मोठा फटका भाजपाला २०१९ मध्ये बसेल असं आकडेवारी सांगते.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x