मुंबई : जर कर्नाटकात भाजप जिंकली तर तो ईव्हीएम मशिनचा म्हणजे ईव्हीएम घोटाळ्याचा विजय असेल असे उद्गार काढले होते. आज त्यालाच अनुसरून राज ठाकरेंनी, त्यांच्या फेसबुक पेजवर कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक मार्मिक टिपणी केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयावर प्रश्न चिन्हं उपस्थित करत अप्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेवर चिंता व्यक्तं केली आहे. कर्नाटक निवडणुकीआधी प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले होते की, जर कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपा जिंकली तर तो ईव्हीएम मशिनचा म्हणजे ईव्हीएम घोटाळ्याचा विजय असेल असे सूचक विधान केले होते.

त्यांच्या त्याच आधीच्या वक्तव्याला अनुसरून त्यांनी सध्याचे निकाल पाहता एक मार्मिक टिपणी केली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक मार्मिक पोस्ट टाकली आहे. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे,’इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो’.

राज ठाकरेंच्या या मार्मिक पोस्टला प्रचंड लाईक्स मिळत आहेत.

karnataka Assembly election raj thackrey has given credit to evm machines