14 May 2021 4:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
निकालापासून फडणवीसांकडून ना राज्यपालांची भेट, ना पंतप्रधानांची, ना राष्ट्रपतींची... पण दिली ही रोजची प्रतिक्रिया गुजरातमध्ये कोरोना मृतांच्या आकड्यांची खोटी माहिती? 1.23 लाख मृत्यूचे दाखले वितरित अन कोरोनाने मृत्यूचा आकडा 4218 दिल्लीकरांसाठी देवदूत ठरलेल्या बी श्रीनिवास यांच्याविरोधात क्राईम ब्रांच फेरा | मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा संताप 91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये तुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत, पंतप्रधान, गृहमंत्री गायब - संजय राऊत कोरोना आपत्ती | जाहीर आकडेवारी पेक्षा भारत आणि मेक्सिकोमध्ये दुप्पट मृत्यू - अमेरिकन इंस्टीट्यूटचं विश्लेषण
x

केंद्राकडून पूरग्रस्त केरळसाठी ५०० कोटींची मदत जाहीर

तिरुवनंतपुरम : केरळच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० कोटी रुपयांची आपत्कालीन मदत जाहीर केली आहे. केरळच्या संपूर्ण इतिहासात झाला नसेल इतका पाऊस केरळमध्ये काही दिवसांपासून पडत आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्यच ठप्प झाल्यासारखी स्थिती आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यानंतर मोदींनी केरळचे मुख्यमंत्री पीनरयी विजयन आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्राकडून ५०० कोटीची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याआधी केंद्राकडून १०० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती आणि त्यात आता ५०० कोटी अतिरिक्त देण्यात येणार आहेत.

त्याशिवाय पंतप्रधान मदतनिधीतून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे. केंद्राकडून ६०० कोटीची एकूण मदत जाहीर करण्यात आली असली तरी केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाने टि्वट करून माहिती दिली की पंतप्रधानांकडे २००० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ५०० कोटी रुपये मदतीची घोषणा मोदींनी केलीआहे. केरळच एकूण १९,५१२ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री विजयन यांनी पंतप्रधानांना दिली आहे. त्यामुळे वास्तविक जास्त मदतीची गरज असल्याचं विजयन यांनी सूचित केलं आहे.

मोदींनी मुख्यमंत्री विजयन, केंद्रीय मंत्री के. जे. अल्फॉन्स आणि अन्य अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने टि्वट करून माहिती दिली की पंतप्रधानांकडे २ हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ५०० कोटी रुपये मदतीची घोषणा पंतप्रधानांनी केली. राज्याचे १९ हजार ५१२ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री विजयन यांनी मोदींना दिली. या महापूरामुळे २.२३ लाख जनता आणि ५०,०० कुटुंबे बेघर झाली आहेत. तसेच या सर्व बाधित लोकांना १,५६८ मदत केंद्रांमध्ये हलवण्यात आल्याची माहिती सुद्धा विजयन यांनी दिली आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1538)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x