5 May 2024 4:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

मोदींना काय वाटतं ते संभाजीराजेंना नव्हे तर चंद्रकांतदादांना कळवलं होतं? का भेट दिली नाही त्यावर अजब प्रतिक्रिया

Maratha reservation

पुणे, २४ मे | मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजे यांनी त्यांचं मत मांडलं आहे. विनायक मेटे यांनीही आपली बाजू मांडली. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालं तर भाजपचे कार्यकर्ते त्यामध्ये पक्षाचा झेंडा आणि बॅनर बाजूला ठेवून सहभागी होतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फार सविस्तरपणे बोलणे टाळले.

दरम्यान, कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आता रणशिंग फुंकले आहे. राज्यातील मराठा समाजाच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी मुंबई आणि मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे.

संभाजीराजे यांनी आज (२४ मे) शाहु महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतल्यानंतर आरक्षणावरील भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, बहुजन समाजाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. मराठा समाजाच्या नेमक्या अपेक्षा समजून घेण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहे.

सुप्रीम कोर्टाने निकाल धक्कादायक आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काय कायदेशीर मार्ग आहे, त्याची चाचपणी केली पाहिजे. त्यासाठी मी 27 मे रोजी मुंबईत जाणार आहे. 27 किंवा 28 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असं त्यांनी सांगितलं. मी या आंदोलनाचं नेतृत्व करत नाही. तर समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे, असंही ते म्हणाले.

केंद्र आणि राज्य सरकारला मदत करण्याचीच आमची भूमिका आहे. पण या समाजाला कोणीही वेठिस धरू नये. समाजाची दिशाभूल होऊ नये हे आमचं म्हणणं आहे, असं त्यांनी सांगितलं. समाज अस्वस्थ आहे. हे मान्य आहे. पण कोरोना काळात जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या. आंदोलनापेक्षाही जीव वाचणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सरकारने समाज रस्त्यावर उतरणार नाही याची खबरदारी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.

समाजाने 58 मोर्चे काढलेले आहेत. त्यातून सरकारपर्यंत भावना पोहोचवण्यात आल्या आहेत. आता कितीवेळ लोकांना रस्त्यावर आणायचं? कोरोनाचं वातावरण आहे. त्यामुळे आंदोलन आणि उद्रेक हा शब्द काढणंही योग्य नाही, असं सांगतानाच सर्व पक्षीय नेत्यांनी या प्रश्नावर काय मार्ग काढता येईल ते पाहावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi thinks that Maratha reservation is a state issue. That is why Prime Minister Modi has not been able to meet Sambhaji Raje Chhatrapati till date, said BJP state president Chandrakant Patil. Sambhaji Raje has given his opinion about Maratha reservation.

News English Title: Narendra Modi thinks that Maratha reservation is a state issue reason never meet MP Sambhajiraje said Chandrakant Patil news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x