20 May 2022 9:20 AM
अँप डाउनलोड

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांची पंतप्रधानपदाची शपथ

इस्लामाबाद : पाकिस्तानी क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन यांनी १९९६ मध्ये ‘तहरीक-ए-इन्साफ’ पक्षाची स्थापन केली होती. तर २०१३ मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि जिकंले सुद्धा व पाकच्या संसदेत पोहोचले. दरम्यान २०१८ च्या निवडणुकांमध्ये त्यांनी नव्या पाकिस्तानची घोषणा केली आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर निशाणा साधला होता, ज्यामुळे पाकिस्तानच्या मतदाराने सुद्धा त्यांना साथ दिली होती.

आज त्याचेच फलित म्हणजे त्यांनी स्थापन केलेला पक्ष तहरीक-ए-इन्साफ आज सत्तेत आला असून त्यांनी पाकिस्तानच्या २२ व्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. काँग्रेस नेते व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासह अनेक माजी आणि विद्यमान क्रिकेटपटू या सोहळ्याला उपस्थित होते. परंतु आज अत्यंत साध्या पद्धतीने हा शपथविधी सोहळा पार पडला आहे.

२५ जुलैला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचा सर्वाधिक जागांवर विजय झाला होता. पाकिस्तानच्या सैन्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होते. केवळ पाकिस्तानच्या जनतेलाच नव्हे तर भारतातील जनता तसेच सरकारसुद्धा याकडे सकारात्मक नजरेने पाहत आहेत.

हॅशटॅग्स

#Pakistan(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x