8 June 2023 11:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली Numerology Horoscope | 09 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार? Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस? Guru Rashi Parivartan | पुढील एक वर्ष या राशींवर राहील देव गुरूंचा आशीर्वाद, फायद्याच्या अनेक शुभं घटना घडतील RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
x

वैभव खेडेकर मनसेचे कि राष्ट्रवादी पक्षाचे आहेत? | खेड नगरपरिषदेत इंधन घोटाळा कोणी केला? - रामदास कदम

Ramdas Kadam

खेड, १९ सप्टेंबर | वैभव खेडेकर मनसेचे पक्षाचे आहेत कि राष्ट्रवादी पक्षाचे आहेत? असा संभ्रम खेडच्या जनतेला पडला आहे त्यांच्या आरोपाना आपण भीक घालत नाही असा पलटवार माजी पर्यावरण मंत्री शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दि. १८ रोजी खेड येथे पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर खोटे, दिशाभूल करणारे आरोप केले आहेत असे कदम यांच्या म्हटले आहे.

वैभव खेडेकर मनसेचे कि राष्ट्रवादी पक्षाचे आहेत?, खेड नगरपरिषदेत इंधन घोटाळा कोणी केला? – Shivsena leader Ramdas Kadam reply to MNS leader Vaibhav Khedekar over allegations regarding minister Anil Parab :

राजकीय पोळी भाजुन घेण्यासाठी बेछुटपणे आरोप:
माझी बदनामी करणारे जनमानसामध्ये, माझ्या पक्षामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये माझ्या बाबतीत गैरसमज पसरवुन आपली राजकीय पोळी भाजुन घेण्यासाठी खेडेकर यांनी बेछुटपणे आरोप केले आहेत. त्यांचा मी धिक्कार करीत असुन तीव्रपणे निषेध करीत आहे अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या विरोधात जे आरोप केले होते, त्या संदर्भात ते न्यायालयात गेले होते. त्यांच्या विरोधात निकाल लागला तर १ महिन्यांसाठी त्यांना स्थगिती दिली आहे. त्याचा विपर्यास करून जणू काय न्यायालयाने त्यांना क्लीन चीट दिली असे भासवून शिमगा सण त्यांनी साजरा केला, याचे मला आश्चर्य वाटते अशीही बोचरी टिका कदम यांनी केली आहे.

खेड नगरपरिषदेच्या पैशांची लूट कोणी केली?
नगरपरिषदेच्या पैशांची लूट कोणी केली? हे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी सांगायला हवे होते, पुढे चौकशीमध्ये योग्य ते निष्पन्न होईलच. किरीट सोमय्या यांना भेटून अनिल परब यांच्या हॉटेलची तक्रार केली हा जावईशोध वैभवरावानी लावलेला दिसतो. फक्त आमच्या कुटुंबांमध्ये भांडणे लावण्यासाठी हे कट कारस्थान आहे. मी कडवा शिवसैनिक आहे. मी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, असे स्वप्न वैभव खेडेकर यांना पडले असावे किंवा विधानसभेच्या निवडणुकिच्या वेळी मातोश्रीच्या पायऱ्या व माजी पालकमंत्र्यांच्या पायऱ्या ज्यांनी शिवसेनेतुन तिकीट मागण्यासाठी झिजवल्या ‘त्या’ नेत्याच्या मैत्रीचा हा परीणाम असावा असे वाटते असा टोला त्यांनी माजी आमदार संजय कदम यांचे नाव न घेता लगावला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Shivsena leader Ramdas Kadam reply to MNS leader Vaibhav Khedekar over allegations regarding minister Anil Parab.

हॅशटॅग्स

#VaibhavKhedekar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x