12 December 2024 9:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

शिंदे गटाच्या आमदारांची आमदारकी जाणार? सुप्रीम कोर्टाच्या निकालात प्रतोद आणि शिंदेंच्या गटनेतेपदाची निवड ही बेकायदेशीर असा स्पष्ट लेखी उल्लेख

Maharashtra Political Crisis

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला. ज्यामध्ये कोर्टाने शिंदे सरकार हे केवळ थोडक्यात बचावल्याचं समोर आलंय, परंतु सुप्रीम कोर्टाने निकालात बेकायदेशीर असा स्पष्ट लेखी उल्लेख करून शिंदे गटाला चक्रव्यूहात अडकल्याचे कायदेतज्ज्ञ अंतिम निकालाची प्रत उपलब्ध झाल्यानंतर सांगत आहेत.

एकाबाजूला आमदार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेतील असं म्हणत व्हीप, प्रतोद आणि शिंदेंच्या गटनेतेपदाची निवड ही बेकायदेशीर असा स्पष्ट लेखी उल्लेख निकालात दिल्याने शिंदे गटातील आमदार आमदारकी गमावतील हेच स्पष्ट होतंय. शिंदे-फडणवीस केवळ आमदार फुटू नयेत म्हणून फिरवाफिरवीची आणि सोयीप्रमाणे उत्तर देतं असल्याचं म्हटलं जातंय. त्यांनाही वास्तव माहिती असून यावर अधिक चर्चा न करण्याचं ठरवून आपल्या दौऱ्यावर निघून गेले आहेत.

विशेष म्हणजे या निकालातील शिवसेना पक्षासंदर्भातील लेखी उल्लेखाने शिवसेना पक्ष देखील शिंदेंच्या हातून गेल्यास आश्चर्य वाटू नये असं कायदेतज्ज्ञ सांगत आहेत आणि त्याला कारण म्हणजे सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात केलेल्या काही विषयांचा लेखी उल्लेख ज्याला शिंदे आव्हान देऊ शकणार नाहीत. त्यामुळे आमदार आणि पदाधिकाऱ्यांना दाखवत असले तरी शिंदे टेन्शनमध्ये असल्याचं वृत्त आहे.

अनिल परब यांची पत्रकार परिषद :
आज शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना अनिल परब म्हणाले की, सुनील प्रभूंचे व्हिप सर्व सदस्यांना लागू होतात, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदाची निवडही रद्द केली आहे. त्याच्यावर निकालातून शिक्कामोर्तब झाला आहे. अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड कोर्टाने योग्य ठरवली आहे. यामुळे आता विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. त्यांना निकालात दिरंगाई करु नये, कारण सर्व रेकॉर्ड विधानसभा सचिवालयाकडे उपलब्ध आहे. निकालास उशीर झाल्यास आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असे अनिल परब यांनी सांगितले. १५ दिवसांत हा निकाल द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

अध्यक्षांना जावे लागणार
अध्यक्ष ४० अपात्र आमदारांच्या मतांवर निवडून आले आहे. यामुळे ते अवैध आहे. त्यांनाही जावे लागणार आहे, असा दावा अनिल परब यांनी केला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Political Crisis after Supreme court decision check details on 12 May 2023.

हॅशटॅग्स

#Maharashtra Political Crisis(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x