13 May 2021 3:21 AM
अँप डाउनलोड

किम जोंग ठणठणीत! खत कारखान्याच्या उद्घाटनाला प्रकटला

Kim Jong Un, President North Korea

प्योगयांग, २ मे: उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा हुकूमशहा किम जोंग उन हे गंभीर असल्याचे वृत्त काही अमेरिकी माध्यमांनी दिले होते. दक्षिण कोरियाकडून या संदर्भातील वृत्तांची माहिती घेण्यात आल्याचं म्हटलं गेलं. या वृत्ताला अधिकृतपणे कोणताही दुजोरा मिळालेला नव्हता. काही अमेरिकी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग उन यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांची तब्येत खालावली. काही माध्यमांनी त्यांच्यावर ह्रदयशस्त्रक्रिया करण्यात आल्याचे म्हटले आहे. पण त्यालाही दुजोरा मिळालेला नव्हता.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनएनने याबाबतचे वृत्त दिले होते. अमेरिकन गुप्तचर संस्था उत्तर कोरियातील घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत. एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले होतेकी, किम यांची प्रकृती मागील काही महिन्यांपासून ठिक नाही. लठ्ठपणाचा त्यांना त्रास होता. त्याशिवाय अति धुम्रपानाच्या आहारी ते गेले होते. किम हे ११ एप्रिल रोजी दिसले होते. इतकंच नव्हे किम यांचे आजोबा आणि उत्तर कोरियाचे दिवंगत नेते किम उल संग यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या १५ एप्रिलच्या कार्यक्रमात त्यांची अनुपस्थिती होती. किम यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली होती.

मात्र उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी अखेर सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली. मागील तीन आठवड्यांपासून त्यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, उत्तर कोरियाच्या शासकीय माध्यमांनी किम जोंग उन यांचा एका कार्यक्रमातील फोटो प्रसिद्ध केले आहेत. किम जोंग उन यांनी शुक्रवारी एका खत कारखान्याचे उद्घाटन केले. त्याचे फोटो उत्तर कोरियातील माध्यमांनी प्रकाशित केले आहेत.

किम जोंग उन या फोटोत लाल फित कापून कारखान्याचे उद्घाटन करताना दिसत आहेत. यावेळी किम जोंग उन यांची प्रकृती उत्तम असल्याचेही दिसत आहे. फोटोत त्यांच्याशिवाय त्यांची बहीण किम यो जोंग आणि काही अधिकारी दिसत आहेत. त्याशिवाय किम यांनी १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली असल्याचे म्हटले आहे.

 

News English Summary: North Korean President Kim Jong Un finally attended the public event. For the past three weeks, there have been heated discussions about his condition. However, North Korean state media have released photos of Kim Jong Un at an event.

News English Title: Story North Korea dictator President Kim Jong Un alive first public appearance after twenty days News Latest Updates.

हॅशटॅग्स

#North Korea(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x