28 September 2020 10:00 PM
अँप डाउनलोड

आता पाक लष्कराला भारतावर हल्ल्याचा आदेश देऊ का ? इम्रान खान संतापले

Article 370, Jammu Kashmir, PM Imran Khan, Prime Minister Imran Khan

इस्लामाबाद : कलम ३५- ए आणि ३७० वरून मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील वातावरण तापत चाललं होतं. अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता काश्मीरमध्ये वेगानं घडामोडी घडत होत्या. काश्मीरमधील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर २ दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याची शिफारस केली. या शिफारशीला राष्ट्रपतींनीही देखील मान्यता दिली आहे. देशाच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय मोदी सरकारने घेतल्याची सर्वत्र रंगली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

जम्मू व काश्मीरमध्ये मंत्रिमंडळ असेल परंतु या कायद्याला केंद्रशासित राज्याचा दर्जा असेल तर लडाख हा मंत्रिमंडळ नसलेला केंद्रशासित प्रदेश असेल असा प्रस्ताव अमित शाह यांनी राज्य सभेत काल मांडला होता. यामुळे काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्यात येणार आहे. या तरतुदीमुळे जम्मू व काश्मीरचा दर्जा अन्य राज्यांप्रमाणेच होणार आहे अशा जोरदार बातम्या पसरू लागल्या.

दरम्यान, भारत सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयावर पाकिस्तानचा जळफळाट होताना दिसत आहे. पाकिस्तानच्या संसदेत आज मोठा राडा झाला असून विरोधीपक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांना धारेवर धरले आहे. यावेळी पाकिस्तान सरकारनं भारताला जशीच्या तशी तीव्र प्रतिक्रिया द्यायला हवी, अशी मागणी विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ यांनी केली. शरीफ यांना उत्तर देताना इम्रान खान यांनी भंजाळल्याप्रमाणे उत्तरे दिली आहेत.

मी पाकिस्तानी सैनिकांना भारतावर हल्ला करण्याचा आदेश द्यायला हवा?, हे विरोधी पक्षनेत्यांना हवंय का ? अशी प्रतिक्रिया इम्रान खान यांनी दिली. पाकिस्तानातील नेते आणि त्यांच्या पंतप्रधानाकडून वापरण्यात येणारी भाषा पाहता भारताच्या निर्णयामुळे जळफळाट होताना दिसत आहे. दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी देखील भारत खतरनाक खेळ खेळत असल्याचं म्हंटले आहे. भारताच्या कृतीचा परिणाम संपूर्ण भागावर होणार आहे, तो भयानक असणार असून या निर्णयामुळे काश्मीर मुद्दा आणखी किचकट बनविण्याचा आरोप त्यांनी लावला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Pakistan(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x