कोलंबो : बौद्ध आणि मुस्लिम समुदायामध्ये वाद उफाळल्याने श्रीलंकेतील सरकारकडून कँडी भागात १० दिवसांची आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघ सुद्धा सध्या टी – २० तिरंगी सामन्यासाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे.

श्रीलंकेतील या भागात बऱ्याच महिन्यापासून बौद्ध आणि मुस्लिम समुदायामध्ये वाद सुरु होते. परंतु काही दिवसांपुरी बौद्ध आणि मुस्लिम समुदायामधील वाद आता विकोपाला पोहोचला आहे. परंतु त्यातून होणाऱ्या हिंसाचाराचे लोण सर्वत्र पसरू नये म्हणून श्रीलंकन सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर कँडी भागात १० दिवसांची आणीबाणी घोषित केली आहे.

भारतीय पुरुष क्रिकेट संघ सध्या टी – २० तिरंगा मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. परंतु त्या सामान्यांना काहीच बाधा येणार नसल्याचे सूत्रांकडून समजतं आहे. त्या दोन समुदायातील उसळलेला हिंसाचार हा कँडी भागा पुरता मर्यादित आहे. परंतु टी – २० तिरंगा मालिकाही कोलंबो मध्ये पार पडणार असून तेथे या घोषित झालेल्या आणीबाणीचा काहीच सावट नसल्याने मालिका ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पार पडेल असे कळविण्यात आले आहे.

Sri lanka has declared a state of emergency for 10 days