13 December 2024 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा
x

त्रिपुरा विधानसभा भाजपच्या ताब्यात; डाव्यांच साम्राज्य उद्ध्वस्त.

अगरतला : त्रिपुरा मधील डाव्यांच्या २५ वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावून त्रिपुरा विधानसभेवर बहुमताने भाजपचा झेंडा फडकला. त्रिपुरा भाजपचे प्रभारी सुनील देवधर यांनी या विजयामध्ये मोठी कामगिरी निभावल्याचे समजते.

सुनील देवधर यांची ३ वर्षापूर्वी त्रिपुराच्या प्रभारीपदी नियुक्ती झाली होती. मागील विधानसभेत निवडणुकीत त्यांच्या एकूण ५० उमेदवारांपैकी ४९ उमेदवारांचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाले होते इतकी वाईट परिस्थिती होती. परंतु सुनील देवधर यांनी त्रिपुरातील जवळजवळ ६० पेक्षा अधिक विधानसभा क्षेत्र दौरे करून पिंजून काढले.

गावागावात छोट्या सभा घेऊन जनाधार आणि संपर्क वाढवण्यावर भर दिला. त्यांनंतर पक्ष तरुणांपर्यंत पोहोचविण्यापेक्षा हजारो तरुणांना प्रत्यक्ष पक्षाशी जोडले आणि जोमाने प्रचार चालू ठेवला. जर विद्यमान सरकारला घरी नेस्तनाबूत करायचे असेल तर पक्षाचा प्रचार हा ग्रामीण भागात घेऊन जाण्यावर अधिक भर दिला आणि त्यांना प्रचंड यश सुद्धा संपादन झाले ज्याचा परिणाम आजचे विधानसभेचे निकाल असल्याचे बोलले जात आहे.

हॅशटॅग्स

#Tripura Assembly Election 2018(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x