3 August 2020 2:40 PM
अँप डाउनलोड

राज्य सरकारचा व्हीआयपी नेत्यांसाठी २२५ कार खरेदीचा निर्णय.

मुंबई : राज्य सरकारने व्हीआयपी नेत्यांसाठी तब्बल २२५ कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये एका बुलेटप्रूफ टोयोटा फॉर्च्युनर गाडीचा समावेश आहे. त्या एका बुलेटप्रूफ गाडीची किंमत तब्बल ५६ लाख रुपये इतकी आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

नंतर उपलब्ध होणारी ती एकमेव बुलेटप्रूफ कार ही नक्षलग्रस्त भागाच्या दौऱ्यावर येणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी वापरली जाणार आहे. ती एकमेव बुलेटप्रूफ कार तब्बल ५६ लाख रुपयांची असून तिचा ताबा राज्य सरकारच्या प्रोटोकॉल विभागाकडे असेल.

या खरेदीबाबतचा अधिकृत जीआर राज्याच्या सामान्य प्रशासनाने जरी केला आहे. राज्याच्या गृह विभागाचे अप्पर सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या वाहन खरेदी प्रस्तावाला मान्यता देताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अप्पर सचिवांच्या या निर्णयाला मान्यता देऊन तास जीआर सुद्धा प्रसिद्ध करण्याचे आदेश सामान्य प्रशासनाला दिले.

राज्यात इतरही बऱ्याच समस्या समोर असताना राज्य सरकारने हा तब्बल २२५ कार खरेदीचा निर्णय घेतल्याने विरोधक नेमकी काय भूमिका घेणार याकडेच सर्वांचे लक्ष्य आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(463)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x