25 April 2024 1:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Wipro Share Price | भरवशाच्या विप्रो शेअर्सबाबत तज्ज्ञांचा इशारा, शेअर होल्ड करावा की सेल करावा? Tata Group IPO | पैसे तयार ठेवा! टाटा गृपचा IPO येतोय, मालामाल होण्याची मोठी संधी, डिटेल्स जाणून घ्या My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार?
x

केरळला तुफान पावसाने झोडपलं, आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू: ANI

केरळ : केरळमध्ये कालपासून पावसाने थैमान घातले असून त्यात जवळपास २९ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तुफान बरसणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे इडुक्की धरण पूर्ण भरले असून आता पाणी ओसंडून वाहू लागल्याने धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.

केरळच्या इतिहासात पहिल्यांदाच पावसामुळे अशी परिस्थिती उद्भवली असल्याचं म्हटलं जात आहे. या अतिवृष्टीमुळे जवळपास ५४००० लोकं बेघर झाल्याचं केरळ सरकारने म्हटलं आहे. तुफान पावसाचा फटका जवळपास ६ जिल्ह्यांना बसल्याच वृत्त आहे. सरकाकडून सर्व मदत कार्य सुरु असून अनेक ठिकाणी पावसामुळे मदतकार्यात सुद्धा अडथळे येत आहेत.

अनेक ठिकाणी सुरक्षेच्या करणामुळे शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आली असून लोकांनी महत्वाच्या कामा शिवाय घराबाहेर पडू नये असं सरकाकडून कळविण्यात येत आहे. मदत कार्यात तब्बल १०,४०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x