मुंबई, २१ सप्टेंबर | आनंद गिरी संशयाच्या भोवऱ्यात आहेत कारण नरेंद्र गिरी यांच्याशी त्यांचा वाद खूप जुना होता. याचे कारण बाघंबरी गादीची 300 वर्ष जुनी वसीयत आहे, जी नरेंद्र गिरी सांभाळत होते.काही वर्षांपूर्वी आनंद गिरी यांनी नरेंद्र गिरी यांच्यावर 8 बिघा जमीन 400 कोटींना विकल्याचा आरोप केला होता, त्यानंतर हा वाद आणखी वाढला. आनंदने नरेंद्रवर आखाड्याच्या सेक्रेटरीचा खून करायला लावल्याचा आरोपही केला होता.
महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू हा हिंदूत्वाचा गळा घोटण्याचा प्रकार – Suspicious death of Mahant Narendra Giri is form of strangulation of Hindutva said MP Sanjay Raut :
दरम्यान, त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी बाघंबरी मठात ठेवण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार नरेंद्र गिरी यांना ब्लॅकमेल केले जात होते. त्यांच्या एका व्हिडिओची सीडी तयार करण्यात आली होती. पोलिसांनी ही सीडीही जप्त केली आहे. नरेंद्र गिरी यांच्या शिष्यांचा असा दावा आहे की महंत नरेंद्र गिरी यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी एक कबुलीजबाब व्हिडिओही बनवला होता.
दुसरीकडे अलाहाबाद उच्च न्यायालयात महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते वकील सुनील चौधरी यांनी प्रयागराजचे डीएम आणि एसएसपी यांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
संजय राऊतांची प्रतिक्रिया:
पालघरमध्ये साधूंची हत्या झाली तेव्हा महाराष्ट्र सरकारवर मोठा दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला होता. उत्तर भारतातूनही चौकशीची मागणी झाली होती. महाराष्ट्र सरकारने त्या प्रकरणात निःपक्ष चौकशी करण्याचा प्रयत्न केला. तशाच पद्धतीने महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. सीबीआय मार्फत ही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. शिवसेनेला हिंदूत्ववादी संघटना म्हणून महंत नरेंद्र गिरी यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. त्यांचा संशयास्पद मृत्यू हा हिंदूत्वाचा गळा घोटण्याचा प्रकार वाटत असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदा अयोद्धेत आले होते, तेव्हा त्यांनी महंत नरेंद्र गिरी यांची भेट घेतली होती. त्यांचा आशीर्वाद हिंदूत्ववादी संघटना म्हणून शिवसेनेसोबत होता. त्यांची जेव्हा-जेव्हा भेट झाली, तेव्हा ते एक खंबीर व्यक्तीमत्व म्हणून भेटलेले आहेत. त्यामुळे त्यांचा असा संशयास्पद मृत्यू हा शंका निर्माण करणारा आहे. हा हिंदूत्वाचा गळा घोटण्याचा प्रकार वाटत असल्याचे राऊत यांनी म्हटले.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
News Title: Suspicious death of Mahant Narendra Giri is form of strangulation of Hindutva said MP Sanjay Raut.
