14 December 2024 6:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित एकाही मंत्र्याला राज्यात फिरु देणार नाही, शिंदे समर्थकांमुळे मराठा समाजातील नेते संतापले

Maratha community

Minister Tanaji Sawant | 2019 साली ज्यावेळेस तुम्ही लोकांचा विश्वासघात करून सत्तेत आलात त्यावेळेस पुढच्या सहा महिन्यात आरक्षण गेलं. आम्हा मराठ्यांना काही कळत नाही का? तेव्हा काही आंदोलन वगैरे झालं नाही. सगळे शांत बसले. पण जसंच सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, अशा शब्दात तानाजी सावंतांनी वादग्रस्त विधान केलं. पुढं बोलताना ते म्हणाले, बघा डोकं कसं चालवलं जातं आज ओबीसींमधून आरक्षणाची मागणी केली, पुढच्या दोन महिन्याने एससी प्रवर्गातून मागणी करतील. याच्या मागचा करता करविता कोण आहे? हे जाणून घेणं गरजेचं आहे, असं सावंत म्हणाले. त्यानंतर मराठा समाजात शिंदे गटाविरोधात संतापाचे वातावरण आहे.

योगेश केदार यांचा हल्लाबोल :
योगेश केदार म्हणाले, सावंत यांनी मराठा समाजाच्या ओबीसीमधून आरक्षण या भूमिकेला चुकीच्या पद्धतीने विरोध केला. आंदोलकांना विरोधी पक्षांनी सोडलेली पिलावळ असे संबोधित केले. तसेच आज ओबीसीतून आरक्षण मागत आहे दोन महिन्यांनी एससी मधून आरक्षण मागतील, असेही बोलले.

यातून सावंत यांनी दलित समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. उलट दलित समाज मराठ्यांच्या आरक्षण मागणीला पाठिंबा देत आहे. कारण त्या समाजातील जाणकारांना माहिती आहे की, मराठा समाज एससीचे आरक्षण मागत नाही. हे वास्तव तानाजी सावंत यांना माहिती नसावे.

हो मराठ्यांची ओबीसीमधूनच आरक्षण ही ठाम मागणी आहे आणि राहील. पण एक जबाबदार मंत्री मराठा समाजाच्या भूमिकेला विरोध कसा करु शकतो? याबाबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण द्यावे. त्यासाठी महाराष्ट्रातून त्यांना निवेदने पाठवली जातील. मात्र जर त्यांनीही या बाबीला हलक्यात घेतले तर मात्र मराठा समाज त्यांच्यासहीत एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, त्यांना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही योगेश केदार यांनी दिला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maratha community leaders aggressive against Shinde Government check details 26 September 2022.

हॅशटॅग्स

#Maratha community(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x