18 June 2021 3:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
शिवसेनेने, काँग्रेस-एमआयएम'च्या पुढे जाऊन हिंदुत्वाविरोधात काम करायला सुरुवात केली आहे - गिरीश महाजन मोदींच्या लोकप्रियतेत घट | देशाची लोकसंख्या १२५ कोटी | फक्त २१२६ भारतीयांनी ठरवलं मोदी जगात लोकप्रिय केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार BHR घोटाळा | गिरीश महाजन समर्थकांवर काल कारवाई झाल्यानंतर नाथाभाऊंनी शरद पवारांची भेट घेतली रुग्नाला १ केळ द्यायला ढीगभर भाजप-RSS कार्यकर्ते उपक्रम | अन भातखळकरांची काँग्रेसच्या त्या उपक्रमावर टीका मुंबईकरांनो मुलांची काळजी घ्या | ब्लॅक फंगसमुळे ३ मुलांवर शस्त्रक्रिया | डोळे काढावे लागले अमेरिका | कोरोना लसीनंतर आता कोविड-19 च्या टॅबलेट तयार करणार | संशोधनासाठी 3 अब्ज डॉलर्सचा निधी
x

Health First | जाणून घ्या मोड आलेल्या कडधान्यांचे आरोग्यदायी फायदे

benefits of sprouts

मुंबई ७ मे : वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबत डाएटही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य डाएट आणि व्यायाम केल्याने वजन आटोक्यात येण्यास मदत होते. वेट लॉस प्रोसेसिंगमध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा वापर महत्त्वाचा ठरतो. सुपरफूडमध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश असतो. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रोटीन आणि हाय फायबर्स असतात. यात व्हिटामिन्सही मोठ्या प्रमाणात असतात.

BhagyaVivah Marathi Matrimonial

स्टॅमिना वाढतो
शरीरातील स्टॅमिना वाढणं म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ मिळणं. स्टॅमिना वाढल्यामुळे तुम्ही न थकता दिवसभर कामं करू शकता. अंकुरित धान्यांमुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. यासाठीच सकाळी नाश्ता करताना त्यात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि उत्साही वाटेल.

डोळ्यांचे आरोग्य सुधारते
डोळे निरोगी राहण्यासाठी मोड आलेल्या कडधान्ये लाभदायक ठरू शकते. कारण यामुळे तुमची दृष्टी सुधारते शिवाय डोळ्यांचे विकार होत नाहीत.

पचनक्रिया सुधारते
पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि अॅसिडिटी कमी करण्यासाठी मोड आलेल्या कडधान्ये अवश्य खा. कारण धान्याला मोड आल्यामुळे त्यामधील कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्स आणखी वाढतात. पाचक पदार्थांची वाढ झाल्यामुळे मोड आलेली धान्य शरीरासाठी उत्तम ठरतात.

रोगप्रतिकार शक्ती वाढते
नियमित मोड आलेल्या कडधान्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. ज्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात आणि शरीरा निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे तुम्हाला आजारपणांचा सामना कमी प्रमाणात करावे लागते.

मधुमेहींसाठी उत्तम
जर तुम्ही मधुमेही असाल तर लगेच मोड आलेल्या कडधान्याचे सेवन जरूर करा. कारण काही संशोधनानुसार अकुंरित धान्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. तज्ञांच्या मते मधुमेंहींनी मोड आलेल्या मेथी दाण्यांचा आहारात वापर केल्यामुळे त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.

केस आणि त्वचेसाठी फायदेशीर
मोड आलेल्या कडधान्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स तुमच्या केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात. कारण अंकुरित धान्य खाण्याने रक्त शुद्ध होते. रक्त शुद्ध झाल्याचा परिणाम तुमची त्वचा नितळ आणि चमकदार होते. यामुळे केसदेखील घनदाट आणि मजबूत होतात.

ह्रदयरोगांपासून बचाव
मोड आलेल्या कडधान्याचे सेवन केल्यामुळे ह्रदयरोगाची समस्या दूर होते. यासाठीच रोज तुमच्या आहारात एका तरी अंकुरित धान्याचा समावेश करा. अंकुरित धान्यामुळे ह्रदयविकार येण्याचा धोका कमी प्रमाणात होतो. अंकुरित धान्यामधील पोषततत्त्व रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवतात. ज्यामुळे ह्रदयरोगापासून तुमचा बचाव होतो.

कर्करोग होण्याचा धोका कमी होतो
मोड आलेले कडधान्ये अॅंटी ऑक्सिडंट शरीरातील फ्री रेडीकल्स नष्ट करतात. ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

गरोदर महिलांसाठी उपयुक्त
गरोदर महिलांनी मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. मोड आलेल्या कडधान्यामुळे गर्भाची वाढ चांगली होते. बाळाचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ सुधारण्यासाठी नियमित अंकुरित धान्य खा.

New English Summary: Diet is just as important as exercise for weight loss. Proper diet and exercise can help you lose weight. The use of sprouts is important in weight loss processing. Superfoods include sprouts. Sprouts are high in protein and high in fiber. It also contains a large amount of vitamins.

News English Title:  Sprouts are very much beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(519)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x