15 December 2024 11:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
x

Updates | कोरोनाचा नवा प्रकार जीवघेणा असल्याचे पुरावे नाहीत | उपाय योजनाने रोखणं शक्य

Updates, New type of corona, Great Britain

लंडन, २२ डिसेंबर: ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळल्याने इतर सर्व देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. वेगाने पसरणारा करोनाचा हा नवा प्रकार चिंता वाढवत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) महत्वाची माहिती देण्यात आली आहे. करोनाचा नवा प्रकार अद्यापही अनियंत्रित झालेला नसून योग्य उपाययोजना करत तो रोखला जाऊ शकतो असं आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. एएफपीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

तर दुसरीकडे ब्रिटनमध्ये सापडलेल्या संसर्गजन्य करोना विषाणूचा नवा प्रकार जीवघेणा असल्याचे कुठलेही पुरावे नाहीत, अशी दिलासादायक माहिती अमेरिकेतील भारतीय वंशाचे महाशल्यचिकित्सक विवेक मूर्ती यांनी दिली आहे. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी याच महिन्यात महाशल्यचिकित्सक पदी मूर्ती यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

दरम्यान, लंडनहून दिल्लीला आलेल्या प्रवासी विमानातील ५ प्रवासी हे कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. एकूण २६६ प्रवासी या विमानामध्ये होते. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील ५ प्रवाशांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आता भारताची चिंता वाढली आहे. कारण, युरोपमध्ये सध्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने हाहा:कार माजवला आहे. त्यामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा चतुर्थ श्रेणीचा कडक लॉकडाउन जाहीर केला आहे.

 

News English Summary: With the discovery of a new type of corona in Britain, all other countries have begun to take precautions. The World Health Organization (WHO) has provided important information as this new type of fast-spreading corona raises concerns. The new type of corona is not yet uncontrolled and can be prevented by taking appropriate measures, the health organization said. AFP reports.

News English Title: Updates over new type of corona in Britain news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x