9 June 2023 12:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली Numerology Horoscope | 09 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार? Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस? Guru Rashi Parivartan | पुढील एक वर्ष या राशींवर राहील देव गुरूंचा आशीर्वाद, फायद्याच्या अनेक शुभं घटना घडतील RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
x

कृषी कायद्याला समर्थन | विरोधकांच्या बदनामीसाठी भाजप प्रवक्त्याकडून फेक VIDEO तंत्र

BJP spokesperson Sambit Patra, fake Video

नवी दिल्ली, ३१ जानेवारी: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ओनजीसीचे संचालक संबित पात्रा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे, त्यानंतर ट्विटर अकाऊंट्सने हा व्हिडिओ शेअर करुन केजरीवाल यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु, केंद्र सरकारच्या नवीन तिन्ही कृषी कायद्याचं समर्थन करणारा अरविंद केजरीवाल यांचा हा व्हिडिओ एटिडेट असल्याचा दावा एका फॅक्ट चेकमध्ये समोर आलं आहे. (BJP national spokesperson and ONGC director Sambit Patra shared a video)

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी एडिट केलेला व्हिडिओ शेअर केला आहे. एका मुलाखतीमधील केवळ 18 सेकंदाचा हा भाग समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी हा व्हिडिओ एडिटेड असल्याचं सांगितलं आहे. या व्हिडितो 18 सेकंदाची क्लीप एका मुलाखतीमधील अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांना एकत्र करुन बनविण्यात आली आहे. झी पंजाब हरयाणा हिमाचल यांनी अरविंद केजरीवाल यांचा तो संपूर्ण मुलाखतीचा व्हिडिओ १५ जानेवारी २०२१ रोजी अपलोड केला आहे. वृत्तवाहिनीचे संपादक दिलीप तिवारी आणि जगदीप साधु यांनी ही मुलाखत घेतली आहे. संपूर्ण मुलाखतीचा व्हिडिओ आणि त्यातील बारकावे शेअर करत, संबित पात्रा हे चुकीचा मेसेज पसरवत असल्याचं फॅक्ट चेक मध्ये सिद्ध झालं आहे.

दरम्यान, या 18 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये, शेतकऱ्यांची जमिन नाही जाणार, त्यांचा एमएसपी नाही जाणार, बाजार समिती नाही जाणार, शेतकरी कुठेही आपला माल विकू शकतो, त्याच्या मालाला आता चांगला भाव मिळेल, असे अरविंद केजरीवाल म्हणताना दिसत आहे. मात्र, एकाच मुलाखतीमधील छोटे छोटे भाग तोडून जोडण्यात आल्याचं फॅक्ट चेकमध्ये समोर आलंय. एकूणच भारतीय जनता पक्षाचं फेक व्हिडिओ तंत्र हे अजूनही बंद झालेलं नाही. भाजप विरोधकांच्या बदनामीसाठी असे व्हिडिओ शेअर करून तरुणांच्या मनात नेहमीच संभ्रम निर्माण करत असतात हे अनेकदा समोर आलं आहे.

 

News English Summary: Bharatiya Janata Party national spokesperson and ONGC director Sambit Patra shared a video. So, Twitter accounts have since shared the video, raising questions about Kejriwal’s role. However, a fact check has revealed that the video of Arvind Kejriwal, who supports the three new agricultural laws of the central government, is edited.

News English Title: BJP national spokesperson and ONGC director Sambit Patra shared a video news updates.

हॅशटॅग्स

#SambitPatra(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x