28 June 2022 5:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
2022 Mahindra Scorpio-N | 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ-एन लाँच | किंमत आणि काय खास आहे पहा Pre-Approved Loan | तुम्हालाही प्री-अप्रुव्हड लोनसाठी ऑफर कॉल, ई-मेल किंवा एसएमएस येतात का? | मग हे जाणून घ्या लेट करंट? | सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं त्याचा अर्थ उशिरा कळला? | शिंदे गटाचा मुक्काम 12 जुलैपर्यंत वाढला सुप्रीम कोर्टाने 11 तारखेपर्यंत स्टेटस खो दिला, निर्णय नव्हे | राज्यपालांना अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही | शिंदेंचा विजयाचा उतावळेपणा Horoscope Today | 28 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल शिंदे गट फ्लोअर टेस्टसाठी जाईल? | सभागृहाच्या प्रोसिडिंग सुरू झाल्या तर थेट आमदार बरखास्तीची कारवाई सुरू होऊ शकते Hot Stocks | आज फक्त 1 दिवसात या शेअर्सनी तब्बल 40 टक्क्यांपर्यंत परतावा दिला | स्टॉक्सची यादी पहा
x

भाजपशी चर्चेनंतर आंदोलन स्थगित | आता महाविकास आघाडीला हे बाहेर काढू, ते बाहेर काढू इशारे

Anna Hazare, Shiv Sena, MahaVikas Aghadi

नवी दिल्ली, ३० जानेवारी: प्रजासत्ताक दिनापासून दिल्लीतील परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी धुमश्चक्री झाल्या. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही केला आहे. दुसरीकडे कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची इशारा दिला होता. मात्र, शुक्रवारी त्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. अण्णा हजारे यांच्या या निर्णयावर सोशल मीडियावर शंका उपस्थित केल्या जात असून, शिवसेनेनंही अण्णा हजारे यांना काही सवाल केले आहेत.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री चौधरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीनंतर अण्णा हजारे यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. या निर्णयाचा हवाला देत शिवसेनेनं सामना अग्रलेखातून शंका उपस्थित करणारे काही प्रश्न विचारले आहेत. अण्णांनी उपोषण करू नये म्हणून महाराष्ट्रातील भाजपा पुढारी राळेगणसिद्धीत जाऊन अण्णांशी चर्चा करीत होते. हे चित्र तसे गमतीचेच होते आणि घडलेही अपेक्षेप्रमाणेच. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केले.

केंद्र सरकारला आपण शेतकऱ्यांशी संबंधित १५ मुद्दे दिले आहेत. त्यावर केंद्र सरकार नेमणार असलेल्या उच्चस्तरीय समितीमध्ये योग्य ते निर्णय होतील, असा आपल्याला विश्वास वाटतो म्हणून आपण आपले उपोषण स्थगित करीत आहोत,’ असे अण्णांनी सांगितले. अण्णांनी उपोषणाचे अस्त्र बाहेर काढायचे आणि नंतर ते म्यान करायचे असे यापूर्वीही घडले आहे. त्यामुळे आताही ते घडले तर त्यात अनपेक्षित असे काही नाही,” अशी शंका शिवसेनेनं बोलून दाखवली आहे.

त्यानंतर शिवसेनेच्या या विधानावरुन अण्णा हजारे चांगलेच आक्रमक झाले आहे. तुमचे मंत्री कुणाच्या तरी घरी गेले हे विसरलात का?, असा सवाल अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना अण्णा हजारे म्हणाले की, भ्रष्टाचार केला, त्याला पाठीशी घातलं म्हणून आम्ही आंदोलन केलं होतं. त्यावेळी तुमचा मंत्री कुणाच्या तरी घरी गेला होता. समाज आणि देश या व्यतिरिक्त आमच्यासमोर भाजप शिवसेना , काँग्रेस कुणीच नाही. ज्या ज्या वेळेला आम्हाला दिसलं की हे समाजाला घातक आहे, अशं कृत्य होतं. त्यावेळी आम्ही आंदोलनं केली आहे. हे काही पहिलं आंदोलन नाही. तसेच तुमच्या मंत्र्यांनी किती भ्रष्टाचार केला आणि त्यांना तुम्ही कसं पाठिशी घातलं, याची सविस्तर माहिती माझ्याकडे आहे.

भाजपाची सत्ता आल्यापासून माझी जवळपास ६ आंदोलनं झाली, असं अण्णा हजारे यांनी सांगितले. तसेच हे सर्व सुरु असताना आजच अग्रलेख लिहण्याचं काय कारण होतं, हे माध्यमांनी त्यांना विचारा. त्यानंतर ते काय बोलतायं ते मला सांगा, मग मी सर्व बाहेर काढतो, असा दावा देखील अण्णा हजारे यांनी यावेळी केला आहे.

 

News English Summary: After that, Anna Hazare has become very aggressive with this statement of Shiv Sena. Have you forgotten that your minister went to someone’s house ?, is the question raised by Anna Hazare. Talking to media, Anna Hazare said, “We had agitated because we were corrupt and supported him.” At that time, your minister had gone to someone’s house. Apart from the society and the country, there is no BJP, Shiv Sena or Congress in front of us. Every time we saw that it was dangerous for the society, such an act took place. At that time we have done agitation. This is not the first movement. Also, I have detailed information about how much corruption your ministers did and how you supported them.

News English Title: Anna Hazare has become very aggressive with this statement of Shiv Sena news updates.

हॅशटॅग्स

#Anna Hajare(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x