2 May 2024 4:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा
x

भाजपमध्ये प्रवेश करणारे काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर पोटनिवडणुकीत पराभूत

Gujarat By Poll, MLA Alpesh Thakore, PM Narendra Modi, CM Vijay Rupani

गांधीनगर: केवळ महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीतच नव्हे, तर गुजरातमध्येही भाजपाचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. गुजरातमधील ६ विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपने बायड व थाराद या विधानसभा जागा गमावल्या असून कॉंग्रेसचा विजय झाला.

गुजरात कॉंग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेले अल्पेश ठाकोर हे भाजपमध्ये येऊन मंत्री होण्याचे स्वप्न पाहत होते, पण गुजरातमधील जनतेने त्यांची स्वप्ने चिरडली. २०१७च्या निवडणुकीत राधानपूर विधानसभा जागा अल्पेश ठाकोर यांनी १४ हजाराहून अधिक मतांनी जिंकली होती. आज त्याच मतदारसंघात अल्पेश ठाकोर ३७१४ मतांच्या फरकाने पराभूत झाले.

विशेष म्हणजे स्वतः या सर्व जागांवरील पोटनिवडणूक मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी प्रतिष्ठेची केली होती, कारण ६ पैकी ४ जागा सत्ताधारी भाजपकडे होत्या. राधानपूरचे आमदार अल्पेश ठाकोर आणि बायडचे आमदार धवलसिंग जाला यांनी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

तत्पूर्वी गुजरातच्या मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल असा दावा अल्पेश ठाकोर निवडणूक प्रचारादरम्यान करत होते. मात्र पराभव झाल्यानंतर त्यांना स्वतःची काँग्रेसमधील ताकद आठवू लागल्याचं म्हटलं जातं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x