21 April 2024 6:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 22 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 22 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gratuity Calculator | पगारदारांनो! जर तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर किती लाख ग्रॅच्युइटी मिळेल? येथे जाणून घ्या Ration Card Rules | तुमचा डीलरही कमी रेशन देतो का? फक्त हे काम करा, 1 दिवसात लाईनवर येईल IRCTC Railway General Ticket | रेल्वे जनरल तिकिटाचे हे खास नियम लक्षात ठेवा, अन्यथा तिकीट असूनही मोठा दंड भरावा लागेल EPF Passbook | पगारदारांनो! तुमची बेसिक सॅलरी 10,000 रुपये, वय 30 वर्षे, निवृत्तीनंतर तुम्हाला किती लाख रुपये मिळतील पहा ATM Cash Withdrawal | एटीएममधून पैसे काढताना 'या' लाईटवर लक्ष ठेवा, अन्यथा खाते रिकामे होईल
x

Farm Bills | नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार - राहुल गांधी

The New Agriculture Laws, farmer Bills, Bharat Bandh, Rahul Gandhi, Marathi News ABP maza

नवी दिल्ली, २५ सप्टेंबर : देशात अनेक ठिकाणी नव्या कृषी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे देशातील प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेसनं शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या विधेयकावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांना गुलाम बनवतील, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

“एका चुकीच्या वस्तू आणि सेवा करानं सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) संपवलं. आता नवे कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांना गुलाम बनवतील,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला. तर दुसरीकडे प्रियंका गांधी यांनीदेखील सरकारवर निशाणा साधला. “शेतकऱ्यांना कंत्रीटी शेतीद्वारे अब्जाधीशांचं गुलाम बनवण्यास प्रवृत्त केलं जाईल. यामुळे ना शेतकऱ्यांना मोबदला मिळेल, ना सन्मान. शेतकरी आपल्याच शेतात कामगार होईल, भाजपाचं कृषी विधेयक ईस्ट इंडिया कंपनीची आठवण करून देत आहे. आम्ही हा अन्याय होऊ देणार नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दुसरीकडे केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगार विरोधी जे कायदे संमत केले आहेत त्याचा विरोध आम्ही देशभर करणार असल्याचे कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. लोकसभा आणि राज्यसभेत केलेले कायदे शेतकरी आणि कामगार विरोधी असून कृषी उत्पन्न बाजार समिती मोडीत काढण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्‍यांची फसवणूक होत नव्हती. मात्र बाजार समिती मोडून ही व्यवस्था व्यापाराच्या हातात देण्यात आली आहे. यामुळे शेतकर्‍यांना हमी भाव मिळणार नाही. कंत्राटी शेतामध्येही शेतकर्‍यांची फसवणूक होणार आहे. काँग्रेसने कामगार कायद्यात जे कामगारांना हक्क देण्यात आले होते, ते सगळे काढून टाकण्यात आल्याचेही थोरात यावेळी म्हणाले.

या संदर्भात २८ सप्टेंबरला राज्यपालांची भेट घेतली जाणार आहे. २ ऑक्टोबरला राज्यात सर्व ठिकाणी धरणे आंदोलन करणार असून जागोजागी किसान मेळावे घेणार असल्याचे थोरात यावेळी म्हणाले. २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर राज्यातील शेतकर्‍यांची सह्यांची मोहीम घेतली जाणार आहे.

 

News English Summary: Congress leader Rahul Gandhi on Friday attacked the Narendra Modi government over the three farm bills that were passed in Parliament during the Monsoon Session, saying it will “enslave farmers”. His comments came as several farmers’ outfits intensified their agitation against the legislations and began a nationwide protest. Opposition parties, including the Congress, have extended support to the call of Bharat Bandh.

News English Title: The New Agriculture Laws Will Enslave Our Farmers I Support Bharat Bandh Says Congress Former President Rahul Gandhi Priyanka Gandhi Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x