निलंबित राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवार देखील दिवसभर अन्नत्याग करणार
मुंबई, २२ सप्टेंबर : कृषी विषयक विधेयकांवरुन राज्यसभेत गोंधळ घातल्याने निलंबित झालेले आठ खासदार अन्नत्याग केला आहे. आज दिवसभर मीही अन्नत्याग करुन त्यांच्या अभियानात सहभागी होणार आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी राज्यसभेच्या उपसभापतींसह केंद्र सरकारच्या कृषी धोरणावरही प्रश्न उपस्थित केले.
शरद पवार म्हणाले की, राज्यसभेत कृषी बिलं येणार होती, त्यावर चर्चा अपेक्षित होती. परंतु सरकारनं बिलं घाईनं पास केली. या विधेयकांबाबत सदस्यांना प्रश्न होते, चर्चा करण्याचा आग्रह होता. परंतु हा आग्रह बाजूला ठेवून सभागृहाचे काम पुढे रेटून नेण्याचं दिसत होतं, असं शरद पवार यांनी सांगितले.
उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्याकडून मला अपेक्षा होत्या. मात्र, त्यांचे वागणे बघून मला धक्का बसला. उपसभापतींकडून विचारांना तिलांजली देण्याचे काम झाले, अशी टीका शरद पवार यांनी केली. तसेच आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या उपसभापतींनी सभागृहात नियमांना महत्त्व दिले नाही, ते निलंबित सदस्यांना चहापान द्यायला गेले. मात्र, सदस्यांनी त्यांच्या चहापानाला हात लावला नाही, याचा आपल्याला अभिमान असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्याविषयीचा आपला अंदाज सपशेल चुकल्याची कबुलीही शरद पवार यांनी दिली. तसेच निलंबित खासदारांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचेही शरद पवार यांनी जाहीर केले.
News English Summary: Eight MPs who were suspended due to confusion in the Rajya Sabha over agriculture bills have gone on hunger strike. NCP President Sharad Pawar announced that he would join the campaign by abstaining from food throughout the day. He was speaking at a press conference at the Yashwantrao Chavan Center in Mumbai.
News English Title: Sharad Pawar supports suspended Rajya Sabha MP to abstain from food today Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Peel Off Mask | नवरात्रीमध्ये चेहरा चमकेल, केवळ 2 पदार्थांपासून घरीच तयार करा पिल ऑफ मास्क - Marathi News
- Bigg Boss Marathi | बीबी हाऊसमध्ये वाजणार DJ क्रेटेक्स, एलिमिनेशनची टांगती तलवार असणार डोक्यावर - Marathi News
- Face Pack | आता घरीच तयार करा टोमॅटोपासून बनलेले हे 3 फेसस्क्रब, चेहरा उजळून निघेल - Marathi News
- Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरात होणार रीयुनियन, पुन्हा एकदा पाहायला मिळणार अरबाज आणि निक्कीची केमिस्ट्री
- Shardiya Navratri 2024 | शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटेला असतो समर्पित, अशी गेली जाते देवी चंद्रघंटेची उपासना
- Personal Loan EMI | पर्सनल लोन घेऊन वेळेआधीच फेडताय मग या 4 गोष्टींची काळजी घ्या, नुकसान टाळता येईल - Marathi News
- Devara Movie on Box Office | देवराने पार केली डबल सेंचुरी, प्रेक्षकांची तुफान गर्दी, हॉलिडेमुळे बंपर कमाई - Marathi News
- Bigg Boss Hindi 18 | बिग बॉस हिंदीच्या ग्रँड प्रीमियरची जोरदार चर्चा, घराचा आगळावेगळा लुक आला समोर - Marathi News
- Credit Card Application | पगारदारांनो, सिबिल स्कोर चांगला नसेल तर क्रेडिट कार्ड विसरा, सोबतच आर्थिक नुकसान देखील होईल
- Loan Alert | नोकरदारांनो, 'या' चुकांमुळे कर्जाचा डोंगर डोक्यावरून कधीही उतरणार नाही, या गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News