13 December 2024 7:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

विनोद तावडेंचे राज ठाकरेंना चॅलेंज, 'कट-पेस्ट' चं राजकारण सोडून ठोस भूमिका घ्यावी

MNS, maharashtra navnirman sena, raj thackeray, vinod tawade, bjp, bjp maharashtra

मुंबई: साऱ्या महाराष्ट्रालाच नाही तर जगभरातील मराठी माणसांना आपल्या भाषणाने मंत्रमुग्ध करणाऱ्या राज ठाकरेंना विनोद तावडेंनी खास टोला लगावला आहे. विनोद तावडेंनी राज ठाकरेंना थेट आव्हान देत ‘कट-पेस्ट’ चं राजकारण सोडून काहीतरी ठोस भूमिका घ्या असं म्हटलं आहे. तसंच पुढे ते म्हणाले राज ठाकरेंनी त्यांचा माणूस आमच्या सोबत पाठवावा मग आम्ही त्यांना गावाची दुसरी बाजू दाखवू.

राज ठाकरेंनी भाजपा आणि पंतप्रधान मोदी व अमित शहांविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. आपल्या भाषणात मोदींचे जुने व्हीडिओ राज ठाकरेंकडून दाखविण्यात येत आहेत आणि त्यातील एका व्हीडिओत मोदींचे जवानांबद्दलचे मत दाखविण्यात येत आहे. त्यावर बोलताना तावडे म्हणाले की, ”मोदी काय म्हणाले, व्यापारी हा रिस्क घेतो, तशीच सैन्याची रिस्क असते. सैन्याकडून एकही जवान शहीद न होता, सर्जिकल किंवा एअर स्ट्राईक होणं शक्य आहे का? सैन्य प्लॅनिंग करुन आपलं मिशन पूर्ण करतं तसंच व्यापाऱ्यालाही अशीच रिस्क घ्यायची असते”, असा अर्थ मोदींच्या त्या भाषणाचा होतो. त्यामुळे केवळ कट-पेस्टचं राजकारण न करता राज ठाकरेंनी ठोस भूमिका घ्यावी, असे तावडेंनी म्हटलं आहे.

बाळासाहेब ठाकरेंनंतर त्यांचे राजकीय वारस उद्धव ठाकरे असले तरी बाळासाहेबांची भाषण शैली आणि राज ठाकरे यात अगदी साम्य आहे. जनसागर जमवने आणि त्यांना आपल्या भाषणाने संमोहित करणे हि राज आणि बाळासाहेबांची खुबी. परंतु लोकसभा २०१९ च्या तोंडावर १ हि उमेदवार उभा नसताना केवळ देश वाचवण्याच्या भावनेतून त्यांनी राज्यभर सभा घेण्यास सुरुवात केली आहे.

सध्याची त्यांची भाषण शैली बदलली नसून फक्त त्यात त्यांनी १ तडका लावण्यास सुरुवात केली आहे. आणि हा तडका म्हणजे “लाव रे तो व्हिडिओ” , हा शब्द ऐकताच सभेत एकच असा जल्लोष निर्माण होतो. त्यांनी सध्या आपल्या भाषणा दरम्यान व्हिडिओ पुरावे देण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक सभेत ते मोदींची भाषणं दाखवून ते कशा प्रकारे देशाची दिशाभूल करत आहेत हे लोकांना दाखवत आहेत.

राज ठाकरेंनी मोदींची २०१४ पूर्वीची भाषणं आणि सध्याची काही विवादित भाषणं आपल्या सभेत दाखवण्यास सुरुवात केली आहे, मग त्यात जवानांच्या नावाने मत मागणे, एअर स्ट्राईक च्या नावाने लोकांना परावर्तित करणे असे काही विषय आहेत. तसेच मोदी आणि शहा हे देशाला कसे हुकूमशाहीकडे घेऊन जात आहेत याचे दाखले देत राज ठाकरे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला मतदान न करण्याचे आव्हान करत आहेत.

सध्या संपूर्ण भारतात अशा उत्तम प्रकारे भाषण करणारा दुसरा वक्ता कोणीच नाही हे दुर्दैव. विरोधकांना हि लाजवेल अशाप्रकारे सध्या ते मोदी सरकारला कोंडीत पकडत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी भाजपच्या डिजिटल इंडियाची पोलखोल केली होती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले होते.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x