मुंबई : मुंबईमध्ये भाजपचे गुजराती प्रतिनिधी असलेल्या अनेक मतदारसंघात हळुवार पणे गुजरातीकरणाची सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वास्तविक सत्ताधारी शिवसेना सुद्धा या सर्व विषयांवर मूग गिळून शांत आहे. परंतु भविष्यात हा वणवा महाराष्ट्राच्या राजधानीच भाषिक अस्तित्वच धोक्यात आणेल असं तज्ज्ञांचं मत आहे.
शहरात भाजपचे गुजराती प्रतिनिधी असलेल्या अनेक भागात रस्ते आणि रस्त्यावरील चौकांना नावं तसेच नामफलक केवळ गुजराती आणि इंग्रजीमध्येच लावण्यास सुरुवात झाली आहे. रस्त्यांना दिली जाणार नावं आणि त्या व्यक्तिमत्वाचा महाराष्ट्राच्या व मुंबईच्या जडणघडणीत नक्की योगदान काय असा प्रश्न स्थानिक मराठी जनतेला पडला आहे.
अनेक तज्ज्ञांचं मत जेव्हा या विषयावर जाणून घेतलं तेव्हा त्यांचं स्पष्ट मत मांडल की, मुळात हे प्रतिनिधी इथले आमदार आहेत, पण त्यांची राजकीय शक्ती केवळ गुजराती लोकं आणि गुजराती भाषा इतकाच विचार करते. स्थानिक गुजराती जनतेला खुश करण्यासाठी हा सर्व उठाठेव असून त्यात त्यांना गुजराती समाजातील लोकांचा पाठिंबा मिळत असल्याने त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे असं सांगितलं. इथले प्रतिनिधी असले तरी, राज्यातल्या भाषेबद्दल आणि कायद्याबद्दल त्यांना पूर्ण अनास्था असल्याचं दिसत.
