25 April 2024 4:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा
x

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना लाचार बोलणाऱ्या भाजपच्या 'वाघ'प्रवक्त्याचं कसाब ट्विट?

BJP Spokeperson Avadhut Wagh

मुंबई: राज्यात आणि देशात कोणताही नवं सरकार स्थापन झालं की आधीच्या कामासंदर्भात आढावा बैठका म्हणजे नित्याचाच भाग आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच कथित सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठा दिलासा दिल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी अजित पवार यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले होते. त्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केलं. मात्र तोपर्यंत त्यांच्या ट्विट्स’चे स्क्रीनशॉट्स घेतले गेल्याने मोठी अडचण झाली होती.

तत्पूर्वी देखील त्यांनी एक संतापजनक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा उल्लेख ‘लावारीस’ म्हणून केला असा केला होता. एका ट्विटला उत्तर देताना अवधूत वाघ यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अवधूत वाघ यांनी पातळी सोडून केलेल्या त्या विधानामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत सापडण्याची चिन्ह होती. त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठली होती. त्यांच्या महान अध्यात्म ज्ञानानुसार नरेंद्र मोदी म्हणजे भगवान विष्णूचा ११ वा अवतार असल्याचं वादग्रस्त ट्विट देखील त्यांनी केलं आहे.

मात्र सध्या महाविकास आघाडीच्या बैठका सुरु असल्याने त्यावर वारंवार प्रतिक्रिया देण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आरे बचाव आणि नाणार आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर भाजपचे प्रवक्ते त्या आंदोलकांवरील गुन्ह्यांची तुलना थेट दहशतवादी दाऊद इब्राहिम आणि अजमल कसाब’सोबत करत आहेत. भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी त्या संबंधित ट्विट केलं आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x