23 January 2021 3:07 AM
अँप डाउनलोड

आ.बच्चू कडूंच्या प्रयत्नाने अमरावती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना हक्काचं वाहन मिळालं

MLA Bachhu Kadu

अमरावती: राज्यातील प्रशासकीय पातळीवरील लोकहिताच्या कामांची जवाबदारी जरी जिल्ह्यातील निरनिराळ्या सरकारी खात्यांवर असली तरी, आजची अनेक सरकारी खातीच सुविधां अभावी सामान्य लोकांची कामं वेळेवर मार्गी लावू शकत नाहीत. मात्र स्थानिक लोक प्रतिनिधी जर जागृत असतील तर त्यावर देखील मात करता येणं शक्य असल्याचं अमरावतीमध्ये पाहायला मिळालं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अनेकदा कर्तव्य बजावताना कामात ढिलेपणा आणणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना अद्दल किंवा सज्जड दम देताना अनेकांनी आमदार बच्चू कडू यांना पाहिलं असेल. मात्र तेच अधिकारी काही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचं कळताच स्वतः आमदार बच्चू कडू यांनी पुढाकार घेऊन त्यावर तोडगा काढला आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे.

महाराष्ट्रात आज कोठेही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना राज्य शासनाचे खात्यांतर्गत वाहन सुविधा दिलेली नाही. यामुळे अचलपूर तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत अमरावती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना सुसज्ज गाडी भेट देण्यात आली आहे. त्यामुळे आज राज्यात अमरावती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना पहिलं हक्काचे वाहन मिळालं आहे. स्वतः आमदार बच्चू कडू यांनी त्यासंदर्भात ट्विट केलं आहे.

हॅशटॅग्स

#Maharashtra(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x