13 December 2024 9:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

सुरतमधून राज्य सरकार पाडलं | आता राज्य सरकारही परराज्यातून ऑपरेट होणार? | हा प्रकल्प वेगाने मार्गी लावणार

Mumbai Ahmedabad Bullet Train

Ahmedabad Mumbai Bullet Train | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला आता गती मिळण्याची चिन्हं आहेत. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात स्थापन झालेलं शिंदे-फडणवीस हे नवं सरकार बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात राहिलेलं जमीन अधिग्रहण तातडीने पूर्ण करणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा फास्टट्रॅकवर येणार आहे. तसेच राज्याच्या वाट्याला येणारा खर्चही उचलला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्राला काहीच फायदा नाही :
हा प्रकल्प वादात सापडण्यामागील आणखी एक कारण म्हणजे या प्रकल्पात महाराष्ट्राची भरपूर जमीन अधिग्रहण होत असताना राज्यातील फक्त चार रेल्वे स्थानकांना बुलेट ट्रेनचा थांबा देण्यात येणार आहे. तर गुजरातमधील आठ रेल्वे स्थानकांना थांबा देण्यात येणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जूनमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या सुरतमध्ये अचानक भेटी वाढल्या होत्या :
महाराष्ट्रात सरकार बदलल्याने गुजरातच्या सुरतमध्ये हे काम रेंगाळले होते. कारण या प्रकल्पाचा महाराष्ट्रातील जनतेला कोणताच फायदा नाही. केवळ गुजरात सरकारच्या हट्टापायी हा प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारला जाणार आहे हे देखील सत्य आहे. विशेष म्हणजे १-२ महिन्यात महाराष्ट्रातील सरकार पडणार असल्याची गुजरातमध्ये अनेक मोठ्या नेत्यांनी माहिती होतं. परिणामी सुरतमध्ये रेंगाळलेल्या बुलेट ट्रेनच्या कामांना केंद्रीय मंत्र्यांच्या अचानक भेटीगाठी सुरु झाल्यास होत्या. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ६ जून रोजी सुरतमधील अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्रगतीची पाहणी केली होती. सुरत-बिलीमोरा मार्ग 2026 पर्यंत पूर्ण करण्यासाठी आम्ही वेळापत्रकात आहोत, असे ते म्हणाले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mumbai Ahmedabad Bullet Train Project may approve by Shinde Government check details 03 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x