26 July 2021 12:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

अवकाश संशोधन, विकास क्षेत्र हे खासगी कंपन्यांना खुले करणार - इस्रो

ISRO, K Sivan, Adani Aerospace

नवी दिल्ली , २५ जून : देशातील अवकाश संशोधन आणि विकास क्षेत्रात क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला आहे. अवकाश संशोधन आणि विकास क्षेत्र हे खासगी कंपन्यांना खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत इस्रोचे अध्यक्ष डॉ. के सिवन यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे खासगी कंपनीला इस्रोच्या पायाभूत सुविधा मर्यादित प्रमाणात वापरण्याची मुभा मिळणार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

इस्रोने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार देशातील खासगी कंपनीही उपग्रह निर्मिती, प्रक्षेपक ( रॉकेट ) निर्मिती करु शकणार आहे. उपग्रहांचे प्रक्षेपण करु शकणार आहे. यासाठी खासगी कंपनीला इस्रोच्या पायाभूत सुविधा मर्यादित प्रमाणात वापरण्याची मुभा देण्यात येणार आहे.

अवकाश मोहिमा आणि संशोधनामध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. खासगी क्षेत्राला परवानगी दिली म्हणून इस्रो आपले काम कमी करणार नाही. इस्रोच्या अवकाश संशोधन आणि मानवी मोहिमा सुरुच राहतील असे सिवन यांनी स्पष्ट केले.

लॉकडाउनमुळे अवकाश मोहिमांवर परिणाम
करोना व्हायरसमुळे मानवी अवकाश मोहिम, चंद्रयान-३ य़ा प्रकल्पांना विलंब होणार आहे. त्याशिवाय या वर्षातील १० अवकाश मोहिमांवर परिणाम झाल्याचे सांगितले. लॉकडाउनचा आमच्या मोहिमांवर काय परिणाम झालाय त्याचा इस्रो आढावा घेईल असे त्यांनी सांगितले.

 

News English Summary: A revolutionary decision has been taken in the field of space research and development. It has been decided to open the space research and development sector to private companies. In this regard, ISRO President Dr. K Sivan has made the announcement.

News English Title: Indian Private Sector Can Now Build Rockets ISRO News latest Updates.

हॅशटॅग्स

ISRO(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x