30 May 2023 3:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Calculator | PPF कॅल्क्युलेटर सांगेल 1000 गुंतवून 18 लाख परतावा कसा मिळवायचा, पैसा वाढवणारी माहिती  Loan Recovery Rules | आता तुमचे बॅंकेचे EMI थकले तरी डोन्टवरी, कर्जदाराला आरबीआयने दिलेले महत्वाचे अधिकार लक्षात ठेवा Investment Tips | या सरकारी योजनेत दररोज 45 रुपये गुंतवल्यास 25 लाख रुपये परतावा मिळेल, अधिक जाणून घ्या Multiple Bank Accounts | बँकेत एकापेक्षा जास्त अकाउंट्स असतील तर आधी ही खबरदारी घ्या, अन्यथा... Plan 475 | ममता-नितीश यांचा प्लॅन 475 काय आहे? 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने 52 जागा जिंकल्या होत्या तर 209 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होते Triveni Engineering Share Price | मागील 5 दिवसात त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स तेजीत, नेमके कारण काय? Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर स्टर्लिंग टूल्स शेअरचा गुंतवणूकदारांना 105% परतावा, आता 100% डिव्हीडंड देणार, स्टॉक डिटेल्स पहा
x

ऑक्सफर्डच्या AZD1222 या कोरोना लससाठी अनेक देशांकडून नोंदणी सुरू

Corona Virus vaccine, Oxford University Research

लंडन, २५ जून : एकाबाजूला भारतात करोनाच्या रुग्णांना बर करण्याचा दावा करत पतंजलीनं शोधून काढलेलं औषध कायदेशीर वादामुळे चर्चेत आहेत. परवानगीच्या वादा अडकलेल्या या औषधाची महाराष्ट्रात विक्री करण्यास बंदी आणण्यात आली आहे. त्याचबरोबर राजस्थान सरकारनं या औषधाच्या विक्रीवर बंदी आणली आहे. “कुणीही बाबा रामदेव यांनी तयार केलेल्या करोनावरील औषधाची विक्री करताना आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.

पतंजलीनं करोना आजार बरं करणार कोरोनिल हे औषध शोधून काढलं आहे. या आजारामुळे करोना पूर्णपणे बरा होतो, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. मात्र, हे औषध बाजारात येण्या आधीच वादात सापडलं आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयानं या औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश पतंजलीला दिले होते. तसेच या औषधाच्या चाचण्या केल्या जात आहे.

दुसरीकडे कोरोनावर अनेक देश लस आणि औषध बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी संशोधन करत असलेली कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात आहे. ही लस यशस्वी व्हावी म्हणून युरोपसह अनेक देश प्रयत्न करत आहेत. ही लस मिळवण्यासाठी आतापासूनच युरोपातील अनेक देशांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीबाहेर रांगा लावल्या आहेत. तर काही देशांनी लसीसाठी नोंदणी देखील केली आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या AZD- 1222 या लसीची ज्या लोकांवर चाचणी घेतली. त्याचे रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. गेल्याच आठवड्यात इटली, जर्मनी फ्रांस आणि नेदरलँडने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी कडे ४० कोटी डोसची नोंदणी केली आहे. सरकारी मान्यतेनंतर लवकरच खूप कमी वेळेत अस्ट्रेझेंका या कंपनीमार्फत लसीचे लाखो डोस तयार केले जात आहेत. याबाबत अमेरिका आणि ब्रिटनने आधीच या कंपनीसोबत करार केला आहे. हेल्थ मॅनेजमेंट ओआरजी’ने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

इटलीच्या आरोग्यमंत्र्यांनीही ऑक्सफर्डची लस सर्वात आधी येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे ब्रिटन, स्वित्झर्लंड नॉर्वे सोबत भारतात देखील ही लस तयार केली जात आहे. सध्या जगभरात १० लॅबमध्ये लस बसनविण्याचे काम सुरू आहे. यात ऑक्सफर्डने तयार केलेली लस अंतिम टप्प्यात आहे. तरीही ही लस संपूर्ण जगभरात पोहचण्यासाठी किमान सहा महिने वाट पहावी लागेल असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

 

News English Summary: Many countries are trying to make vaccines and medicines on corona. However, the coronavirus vaccine, which is being researched by Oxford University in England, is in the final stages. Many countries, including Europe, are working to make the vaccine a success.

News English Title: Coronavirus vaccine being researched by Oxford University in England is in the final stages News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x