21 April 2021 9:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आमच्याकडे ऑक्सिजन संपला आहे, तुमचे रुग्ण घेऊन जा | यूपीत अनेक इस्पितळांचा पत्रकांचा सपाटा Health first | दातांचा पिवळेपणा नाहीसा करण्यासाठी करा हे घरगुती उपाय । नक्की वाचा नाशिक दुर्घटना अतिशय वेदनादायी, पण बेपर्वाई करणाऱ्यांना कडक शासन व्हायलाच हवं - राज ठाकरे Health first | प्रवास करताना मळमळ किंवा उल्टी होतेय तर हे करा घरगुती उपाय । नक्की वाचा PPE किट, व्हेंटीलेटर्स, लस ते ऑक्सिजन असं सर्वच प्रथम परदेशात पाठवलं | सर्वांची टंचाई भारतीय भोगत आहेत नाशिक दुर्घटना | मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त | मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर Health first | चहाचा अतिरेक करू नका नाहीतर आरोग्यावर होतील त्याचे वाईट परिणाम । नक्की वाचा
x

Health first | शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी करा हे उपाय। नक्की वाचा

increase hemoglobin with home remedies

मुंबई ८ एप्रिल : मानवी शरीरात रक्तातील लाल पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते. हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने. हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे. हिमोग्लोबिनमुळे रक्तातील ऑक्सिजनचा शरीराला पूरवठा केला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो. हिमोग्लोबिनच्या प्रमाणावरून तुमच्या आरोग्याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. पुरूष आणि स्त्रीयांमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वय, आहाराच्या सवयी यानुसार बदलते. हिमोग्लोबिनचे प्रमाण आवशक्तेपेक्षा कमी झाल्यास शरीरातील लाल रक्तपेशी कमी होतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि आजारपण येण्याची दाट शक्यता असते. यासाठी प्रत्येकाला हिमोग्लोबिन विषयी सर्व माहिती माहीत असायलाच हवी.

BhagyaVivah Marathi Matrimonial

शरीरात लोह, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन लेवल कमी होते. त्यामुळे थकवा वाढतो. एनिमियाची समस्याही होऊ शकते. त्यामुळे या सर्व समस्यांपासून वाचवण्यासाठी हिमोग्लोबिनची लेवल योग्य राखणं गरजेचं आहे.

नैसर्गिक पद्धतीने हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपाय
हिमोग्लोबिन कमी झाल्यावर ते वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. नैसर्गिक पद्धतीने तुम्ही हिमोग्लोबिनची पातळी पुन्हा वाढवू शकतात. यासाठी नैसर्गिक पद्धतीने आणि या घरगुती उपायांनी हिमोग्लोबिनची पातळी वाढवा.

आहारात लोहाचे प्रमाण वाढवा
ज्या लोकांना रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी नैसर्गिक पद्धतीने वाढवायची आहे. त्यांच्यासाठी हा एक साधा आणि सोपा उपाय आहे. लोहयुक्त आहार घेतल्यामुळे तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकते. ज्यामुळे हळूहळू तुमच्या शरीरातील लाल रक्तरेशी नक्कीच वाढू शकतात. आहारात मटण, मासे, सोयाबीन, टोफू, अंडे, सुकामेवा, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्यां, बीट, गाजर असे पदार्थांचा समावेश करून तुम्ही तुमच्या आहारातील लोहाचे प्रमाण वाढवू शकता.

आहारात व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढवा
अनेक भाज्या आणि फळांमधून तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने व्हिटॅमिन सी मिळू शकते. यासाठी आहारात द्राक्षे, संत्री, लिंबू, ब्रोकोली, आंबा, किवी अशा पदार्थांतून तुम्हाला व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर मिळू शकतं.

आहारात फॉलिक अॅसिडचे प्रमाण वाढवा
फोलेट हे शरीराला आवश्यक असणारे महत्त्वाचे व्हिटॅमिन आहे. यामुळे शरीरात हेम म्हणजेच लोहाची निर्मिती होण्यास मदत होते. जर तुम्हाला शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असेल तर हा उपाय नक्की करा. तुम्ही पालक, तांदूळ, शेंगदाणे, चवळी, राजमा, अॅवोकॅडो आणि लॅट्यूस हे पदार्थात आहात समावेश करून हिमोग्लोबिन वाढवू शकता.

व्यायाम
तुम्ही जे अन्न खाता ते तुमच्या शरीरात शोषले जाणे फार गरजेचे आहे. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीराची योग्य हालचाल होते. ज्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यव्यवस्थेवर होतो.

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी या अन्नपदार्थांचा करा आहारात समावेश (Dietary Supplements To Increase Hemoglobin In Marathi)
हिमोग्लोबिनचे प्रमाण नैसर्गिक पद्धतीने वाढवण्यासाठी तुम्हाला योग्य आहार घेणं गरजेचं आहे. कारण आहारातील अनेक पदार्थांतून नैसर्गिक पद्धतीने तुमच्या शरीरातील लोहाची पातळी वाढू शकते.

पालक
पालक या हिरव्या पालेभाजीमध्ये मोठ्या प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असल्यामुळे तुम्ही जर नियमित पालकची भाजी अथवा इतर पदार्थ खाल्ले तर तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकते. शंभर ग्रॅम पालकच्या भाजीमधून अंदाजे तुम्हाला 4 मिलीग्रॅम लोह मिळू शकते.

बीट
बीटामध्ये फोलेटचे प्रमाण सर्वात जास्त असते. म्हणूनच हिमोग्लोबिन कमी झाल्यावर बीटाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. व्हिटॅमिन सी आणि लोह अशा दोन्ही गोष्टी तुम्ही बीट खाण्यामुळे मिळू शकतात. शंभर ग्रॅम बीटामधून जवळजवश 0.8 मिलीग्रॅम लोह मिळते. बीटरूटचा त्वचेवरही चांगला परिणाम होतो. कारण त्वचा उजळ करण्यासाठी बीट उपयुक्त ठरतं

चिकन अथवा मटण
अशक्तपणा झाल्यास त्या व्यक्तीला चिकन अथवा मटणाचे सूप दिले जाते. याचे कारण मटण अथवा चिकनमध्ये खूप मोठ्याप्रमाणावर शरीरातील झीज भरून काढण्याची ताकद असते. मात्र मटण अथवा चिकन करताना ते तेलात न करता उकडून अथवा ग्रील करून खावे. शंभर ग्रॅम चिकन अथवा मटणामधून तुम्हाला 0.7 ते 2.1 मिलीग्रॅम लोह मिळू शकते.

टोमॅटो
टोमॅटो हे लोहाचा एक उत्तम स्त्रोत आहे. शिवाय टोमॅटोमधून तुम्हाला व्हिटॅमिन सी आणि लोह दोन्ही गोष्टी मिळतात. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात भरपूर टोमॅटोचा वापर करा. शंभर ग्रॅम टोमॅटोमधून तुम्हाला 0.8 मिलीग्रॅम लोह मिळू शकते.

अंडे
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे हे तर तुम्ही ऐकलं असेलच. कारण अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. महत्त्वाचं म्हणजे अंडं खाण्यामुळे तुमच्या शरीराला लोह मिळतं. एका अंड्यातून तुम्हाला 1.59 मिलीग्रॅम लोह मिळू शकते.

डाळिंब
डाळिंबामध्ये लोहासोबत कॅल्शियम, प्रोटिन्स, फायबर आणि इतर अनेक व्हिटॅमिन्स असतात. ज्यामुळे त्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. अशक्तपणा झाल्यास डाळिंबामुळे तुमच्या शरीराची झीज लवकर भरून निघते. शंभर ग्रॅम डाळिंबाच्या दाण्यातून तुम्हाला अंदाजे 0.3 मिलीग्रॅम लोह मिळू शकते. डाळिंब आरोग्याप्रमाणेच त्वचेसाठीही उपयुक्त आहे.

सुकामेवा
निरोगी जीवनशैलीसाठी मूठभर सुकामेवा दररोज खावा असं म्हटलं जातं. सुकामेव्यातील अंजीर, जर्दाळू , बदाम, काळ्या मनुका, खारीक अशा अनेक ड्रायफ्रुट्समधून तुम्हाला लोह मिळू शकते. शंभर ग्रॅम सुकामेवा खाण्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे लोह नक्कीच मिळू शकते.

सफरचंद
‘अॅन अॅपल ए डे कीप्स दी डॉक्टर अवे’ हे तर तुम्ही ऐकलं असेल. पण सफरचंदातून तुमच्या शरीराला पुरेसं लोह मिळतं हे तुम्हाला माहीत आहे का. कारण सफरचंदात लोहाचे प्रमाण भरपूर आहे. म्हणूनच हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी दररोज सफरचंद खाण्यास सांगितले जाते. एका सफरचंदातून तुम्हाला अंदाजे 0.31 लोह मिळू शकते.

खजूर अथवा खारीक
गोड चवीचे खजूर अथवा सुकलेले खारीक अनेकांना आवडतात. उपासाच्या दिवशी अथवा अशक्तपणा कमी करण्यासाठी खजूर आवर्जून खाल्ले जातात. खजूराला यासाठीच सूपरफूड असं म्हटलं जातं. खजूरामुळे तुमचे हिमोग्लोबिन वाढू शकते कारण त्यामध्ये लोहाचे प्रमाण मुबलक आहे. एका खजूरामधून तुम्हाला 0.8 मिलीग्रॅम लोह मिळू शकते.

News English Summary: The red blood cells in the human body contain hemoglobin. Hemoglobin is needed to supply oxygen to the blood. Heme means iron and globin means protein. A decrease in hemoglobin is a decrease in the amount of iron in the blood. Hemoglobin supplies oxygen to the body. Anemia occurs when the amount of hemoglobin in the blood is low. Your health can be measured by the amount of hemoglobin. Hemoglobin levels in men and women vary with age and dietary habits. When the hemoglobin level falls below the required level, the red blood cells in the body decrease. Which weakens the immune system and increases the risk of illness. For this, everyone should know all the information about hemoglobin.

News English Title: Home remedies for increasing hemoglobin news update article

हॅशटॅग्स

#Health(302)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x