8 August 2020 11:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अन्यथा सुशांतसिंह प्रकरणावरून राज्य सरकार बरखास्त होईल हे लक्षात ठेवा : आ. भातखळकर Corona Virus | आज राज्यात १२, ८२२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, २७५ रुग्णांचा मृत्यू अस्वच्छतेविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘भारत छोडो’चा नारा मराठा आरक्षण | मेटे धादांत खोटे बोलत असून ते फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिशाभूल करत आहेत मराठा समन्वय समितीवरून अशोक चव्हाणांना हटवा | मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याला विरोध विजयदुर्ग किल्ल्याची पडझड | खा. नारायण राणे यांनी पाहणी केली | केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार किराणा दुकानांवरील कर्मचारी आणि फेरीवाल्यांपासून कोरोना पसरण्याचा धोका अधिक - केंद्र सरकार
x

भारत-चीनमध्ये तणाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लेहला अचानक भेट

Prime Minister Narendra Modi, Ladakh, Leha

लेह, ३ जुलै : भारत आणि चीनदरम्यान लडाखजवळील सीमेवर सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लेहला भेट दिली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता नरेंद्र मोदी लेह येथे पोहोचले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी ही अचानक भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी सैनिकांचे मनोबल वाढवण्याबरोबरच भारत-चीन सीमेवरील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच भारतीय संरक्षण दल प्रमुख बिपिन रावतही उपस्थित आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

खरेतर लष्करप्रमुख नरवणे यांच्यानंतर सीडीएस बिपिन रावत लेह-लडाखच्या दौऱ्यावर जाणार होते. तेथे ते एलएसीवरील सुरक्षेचा आढावा घेणार होते. मात्र, मोदी यांनी अचानक भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत बिपिन रावत देखील असून त्यांनी विमानतळावर मोदींचे स्वागत केले. चीनच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची विचारपूस करण्याची शक्यता आहे.

यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लडाखचा दौरा करणार होते. परंतु, हा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला होता.. यानंतर आता थेट पंतप्रधान मोदीच लेहमध्ये दाखल झाल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला एकटे पाडण्यासाठी भारताने कूटनीतीचा अवलंब करायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. या चर्चेत भारत आणि रशियातील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूूत करण्यावर एकमत झाले. भारताच्यादृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi has paid a surprise visit to Leh in the wake of the ongoing border dispute between India and China near Ladakh. Narendra Modi has reached Leh without any prior notice. It is said that Modi paid a surprise visit to take stock of the situation.

News English Title: Prime Minister Narendra Modi Reaches Ladakh News Latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1260)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x