8 August 2020 11:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अन्यथा सुशांतसिंह प्रकरणावरून राज्य सरकार बरखास्त होईल हे लक्षात ठेवा : आ. भातखळकर Corona Virus | आज राज्यात १२, ८२२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, २७५ रुग्णांचा मृत्यू अस्वच्छतेविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘भारत छोडो’चा नारा मराठा आरक्षण | मेटे धादांत खोटे बोलत असून ते फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिशाभूल करत आहेत मराठा समन्वय समितीवरून अशोक चव्हाणांना हटवा | मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याला विरोध विजयदुर्ग किल्ल्याची पडझड | खा. नारायण राणे यांनी पाहणी केली | केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार किराणा दुकानांवरील कर्मचारी आणि फेरीवाल्यांपासून कोरोना पसरण्याचा धोका अधिक - केंद्र सरकार
x

उत्तर प्रदेशात पोलीस पथकावर गुंडांकडून अंदाधुंद गोळीबार, ८ पोलिसांचा मृत्यू

Uttar Pradesh, Kanpur, 8 policemen martyred

लखनऊ, ३ जुलै : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गुंडांनी पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात डीएसपी देवेंद्र मिश्रा आणि स्टेशन प्रभारी यांच्यासह 8 पोलीस शहीद झाले. विकास दुबेविरोधात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल असून, हे पोलीस पथक त्याला पकडण्यासाठी गेलं होतं. त्यानंतर दुबेच्या गुंडांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात डीएसपीसह ८ पोलीस शहीद झाले. ही बातमी समजताच एसएसपी आणि आयजी घटनास्थळी दाखल झाले असून, फॉरेन्सिक टीमनेही येथे तपासकार्य सुरू केलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पोलिसांकडून या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र, गुंड उंचावरुन गोळीबार करत असल्याने त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे आठ पोलिसांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये उप पोलीस अधीक्षक देवेंद्र मिश्रा, तीन उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे.

या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या डिकरू गावात फॉरेन्सिक टीमही तपास करत आहे. याशिवाय, पोलिसांची अतिरिक्त कुमक गावात तैनात करण्यात आली आहे. विकास दुबेला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी जवळपास १०० मोबाईल फोन ट्रेसवर टाकले आहेत. अनेकांची चौकशी करण्यात आली आहे.

 

News English Summary: In Kanpur in Uttar Pradesh, goons indiscriminately opened fire on a police squad, killing eight policemen, including DSP Devendra Mishra and the station in-charge.

News English Title: Uttar Pradesh 8 policemen including DSP martyred in firing in Kanpur News Latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Yogi Government(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x