12 October 2024 6:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest | 5 वर्षांसाठी केलेली FD 1 वर्षातच तोडायची असल्यास व्याज मिळेल की उलट पैसे कापले जातील No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे मुंबईत निधन

Bollywood, Famous Choreographer Saroj Khan, Passes Away

मुंबई, ३ जुलै : बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे आज पहाटे मुंबईत निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यानंतर सरोज खान यांना २० जून रोजी वांद्रे येथील गुरु नानक रुग्णालयात दाखल केले होते. आज सरोज खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तसेच त्यांची कोविड-१९ची चाचणीही घेतली होती. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. दरम्यान, मालाड येथील मिठी चौकी कब्रिस्तानमध्ये सरोज खान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.

गेल्या बऱ्याच काळापासून त्या बॉलिवूडपासून दूर होत्या. परंतु २०१९ मध्ये मल्टिस्टारर चित्रपट कलंक आणि कंगना रणोतच्या ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात एक गाणं कोरिओग्राफ केलं होतं. सरोज खान या हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या कोरिओग्राफर होत्या. एक दो तीन.. हे गाणं असो किंवा हमको आज कल है इंतजार.. या गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. इतकंच नाही तर चोली के पिछे क्या है.. निंबुडा निंबुडा, डोला रे डोला या गाण्यांचंही नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केलं.

 

News English Summary: Well known Bollywood choreographer Saroj Khan passed away on Friday morning. She was 71 years old. He died of cardiac arrest. He was admitted to Guru Nanak Hospital in Bandra on June 17 due to respiratory problems.

News English Title: Bollywood Famous Choreographer Saroj Khan Passes Away Mumbai News Latest Updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x