8 August 2020 10:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अन्यथा सुशांतसिंह प्रकरणावरून राज्य सरकार बरखास्त होईल हे लक्षात ठेवा : आ. भातखळकर Corona Virus | आज राज्यात १२, ८२२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, २७५ रुग्णांचा मृत्यू अस्वच्छतेविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘भारत छोडो’चा नारा मराठा आरक्षण | मेटे धादांत खोटे बोलत असून ते फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिशाभूल करत आहेत मराठा समन्वय समितीवरून अशोक चव्हाणांना हटवा | मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याला विरोध विजयदुर्ग किल्ल्याची पडझड | खा. नारायण राणे यांनी पाहणी केली | केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार किराणा दुकानांवरील कर्मचारी आणि फेरीवाल्यांपासून कोरोना पसरण्याचा धोका अधिक - केंद्र सरकार
x

कोरोना विषाणूची साथ नैसर्गिकरीत्याच संपुष्टात येईल - संसर्गरोगतज्ज्ञ सुनेत्रा गुप्ता

vaccine, coronavirus infection, Dr Sunetra Gupta

नवी दिल्ली, ३ जुलै : देशात करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. करोनावरील आजारासाठी तयार करण्यात आलेली पूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस COVAXIN ही १५ ऑगस्ट रोजी लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारत बायोटेकनं आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून ही लस तयार केली आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६,२५,५४४ वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी २,२७, ४३९ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ३,७९,८९२ जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, आतापर्यंत देशभरात १८, २१३ लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

दरम्यान, जगातील बहुसंख्य लोकांना कोरोना विषाणूच्या संसर्गावरील प्रतिबंधक लसीची गरज नाही, असे आॅक्सफर्ड विद्यापीठातील संसर्गरोगतज्ज्ञ सुनेत्रा गुप्ता यांनी म्हटले आहे. फ्लूप्रमाणेच हाही आजार आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाबाबत फार चिंता करू नये, असेही त्यांनी सांगितले. सुनेत्रा गुप्ता म्हणाल्या की, जे निरोगी व तरुण आहेत, ज्यांची प्रतिकारशक्ती उत्तम आहे व ज्यांना एकाहून अधिक व्याधी नाहीत अशा लोकांचे कोरोना संसर्गामुळे फार नुकसान झालेले नाही. कोरोना विषाणूची साथ नैसर्गिकरीत्याच संपुष्टात येईल. तसेच फ्लूप्रमाणे हाही आजार आपल्या जीवनाचा एक भाग होईल. कोरोनावर प्रतिबंधक लस तयार करणे तसे सोपे आहे. काही महिन्यांत ही लस बनविण्यात यश मिळेल.

जगभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजविला असून, या साथीचा फैलाव रोखण्याकरिता भारतासह बहुसंख्य देशांनी लॉकडाऊनसह विविध उपाय योजले आहेत. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये अमेरिका पहिल्या तर भारत चौथ्या क्रमांकावर आहे. या साथीचा फैलाव कमी होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. या संसर्गावरील लस शोधण्यासाठी काही देशांत संशोधन सुरू आहे. लॉकडाऊनला सुनेत्रा गुप्ता यांनी नेहमीच विरोध केला असून, आताही त्यांनी याच मतांचा पुनरुच्चार केला आहे.

 

News English Summary: The majority of people in the world do not need a vaccine to prevent coronavirus infection, says Sunetra Gupta, an infectious disease specialist at Oxford University. Outbreaks appear to be exacerbated during the Corona virus. Like flu, it will be a part of our lives.

News English Title: The majority of people in the world do not need a vaccine to prevent coronavirus infection says Sunetra Gupta News Latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1124)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x