11 December 2024 6:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

उत्तर प्रदेशातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली - प्रियंका गाधी

Priyanka Gandhi, Uttar Pradesh, Yogi Sarkar

लखनऊ, ३ जुलै : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गुंडांनी पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात डीएसपी देवेंद्र मिश्रा आणि स्टेशन प्रभारी यांच्यासह 8 पोलीस शहीद झाले. विकास दुबेविरोधात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल असून, हे पोलीस पथक त्याला पकडण्यासाठी गेलं होतं. त्यानंतर दुबेच्या गुंडांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात डीएसपीसह ८ पोलीस शहीद झाले. ही बातमी समजताच एसएसपी आणि आयजी घटनास्थळी दाखल झाले असून, फॉरेन्सिक टीमनेही येथे तपासकार्य सुरू केलं आहे.

पोलिसांकडून या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र, गुंड उंचावरुन गोळीबार करत असल्याने त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे आठ पोलिसांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये उप पोलीस अधीक्षक देवेंद्र मिश्रा, तीन उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे.

या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या डिकरू गावात फॉरेन्सिक टीमही तपास करत आहे. याशिवाय, पोलिसांची अतिरिक्त कुमक गावात तैनात करण्यात आली आहे. विकास दुबेला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी जवळपास १०० मोबाईल फोन ट्रेसवर टाकले आहेत. अनेकांची चौकशी करण्यात आली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे, असा आरोप काँगेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केला. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली आहे. आरोपीला पकडण्यासाठी गेले असता पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करते, असे ट्विट करत उत्तर प्रदेशातील कायदा आण आणु सुव्यवस्था खालावली आहे. गुन्हेगारांची भीती संपली आहे, असा संताप व्यक्त केला आहे.

 

News English Summary: Opposition groups called for a boycott of the Yogi government in the Kanpur clash. Congress general secretary Priyanka Gandhi-Vadra has alleged that law and order has deteriorated in Uttar Pradesh. At the same time, he has demanded that the Chief Minister should take strict action.

News English Title: Law and order situation in up has deteriorated CM should take strict action Priyanka Gandhi Vadra on Kanpur encounter News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x