22 September 2023 11:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nykaa Share Price | भारत आणि कॅनडा वादाचा फटका नायका शेअर्सला, गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? पुढे काय होणार? Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रने नवीन सुविधा सुरु केली, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला महत्वाचा सल्ला, किती फायदा होईल? Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट, शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नेमकं कारण काय? Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 35 टक्के परतावा सहज मिळेल, फायदा घ्या Numerology Horoscope | 22 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांच्या DA आणि पगार वाढीबाबत लेटेस्ट अपडेट, तारीख आणि आकडेबाबत माहिती दिली Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 22 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

ओडिशा, प. बंगालला २४ तासात अम्फान या मोठ्या चक्रीय वादळाचा इशारा

India Odisha and West Bengal, high alert, cyclone Amphan

नवी दिल्ली, १८ मे: भारताच्या किनारपट्टीला लवकरच अम्फान हे चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती मिळाली असून, हे वादळ विक्राळ रूप धारण करणार असल्याचंही हवामान खात्यानं सांगितलं आहे. दिल्ली हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, अम्फान या वादळाचं १२ तासांत सुपर चक्रीवादळ रुपांतरण होईल. ते आता उत्तर-ईशान्यच्या दिशेने सरकत असून, २० मे रोजी दुपारी किंवा संध्याकाळी ते दिघा / हटिया बेट पार करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यावेळी त्याची गती १५५-१६५ ताशी किमी असू शकते आणि तीव्र असल्यास ती 185 ताशी किमी असू शकते. या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ बैठक बोलावली आहे.

दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जाजपूर, भद्रक, बालासोर, मयूरभंज, गंजम, जगतसिंगपूर, गजपती, नायगड, कटक, केंद्रपारा, खुर्दा आणि पुरी या जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तामिळनाडूमध्ये ही अम्फानचा धोका वाढला आहे. येथे रविवारी जोरदार वाऱ्यामुळे शेकडो झाडे कोसळली आणि बरेच नुकसान झाले. कोयंबतूरसह अनेक जिल्ह्यात झाडे कोसळल्याची घटना समोर आली आहे.

चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता सुमारे ११ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. याशिवाय ओडिशामध्ये चक्रीवादळाच्या परिणामानंतर लवकरच वीज, पाणीपुरवठा, रस्ते स्वच्छता, बचाव व मदतकार्य सुरू करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे की, बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी आणि पश्चिम-मध्य भागांत ताशी १३ किलोमीटर वेगाने प्रवास करणारे ‘अम्फान’ १२ तासांत वेग वाढवेल आणि शक्तिशाली रूप घेईल. जोरदार वाऱ्यामुळे कच्च्या घरांचे बरेच नुकसान होणार असून, ‘पक्के’ घरांचे काही प्रमाणात नुकसान होऊ शकते.

 

News English Summary: The Indian Meteorological Department has said that Hurricane Amphan is expected to hit the Indian coast soon. Mrityunjay Mohapatra, director, Delhi Meteorological Department, said the hurricane would turn into a super cyclone in 12 hours.

News English Title: India Odisha and West Bengal on high alert because of cyclone Amphan News Latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x