1 February 2023 3:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Share Price | बजेटचा LIC शेअरला फटका, शेअरच्या किंमतीत मोठी घसरण, पुढे काय होणार? Union Budget 2023 Income Tax | इन्कम टॅक्स सूटचा कोणाला किती लाभ मिळणार? तज्ज्ञांकडून समजून घ्या Union Budget 2023 | पोस्ट ऑफिसच्या दोन योजनांमध्ये गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट, कोणत्या योजना पहा New Tax Regime Changes | टॅक्स पेयर्स लक्ष द्या, अन्यथा या एका चुकीमुळे तुम्हाला 7 लाखांपर्यंत सूट मिळणार नाही Budget 2023 Income Tax | नोकरदारांसाठी मोठी बातमी! अर्थसंकल्पात इन्कम टॅक्समध्ये इतकी सूट दिल्याची घोषणा Union Budget 2023 | खुशखबर, महिलांना मिळणार 2 लाखांचा फायदा, अर्थमंत्र्यांनी केली घोषणा LIC Whatsapp Services | खुशखबर! LIC संबंधित या सर्व सेवा आता व्हाट्सअँपवर ऑनलाईन मिळणार, असे कनेक्ट व्हा
x

Health First | डोळे हा आजार | प्रमुख लक्षणे कोणती - नक्की वाचा

Conjunctivitis symptoms in Marathi

मुंबई, १२ ऑगस्ट | डोळे येणे म्हणजे अचानक डोळयांची जळजळ, दुखणे, पाणी व घाण येणे, पापण्या चिकटणे व प्रकाश सहन न होणे. हा आजार सर्वांच्या परिचयाचा आहे. बहुधा हा आजार साथीच्या स्वरूपात येतो. त्याचे कारण बहुतेक वेळा सूक्ष्मजंतू (जिवाणू-विषाणू) हेच असते.

डोळे येणे जास्त करून लहान मुलांमध्ये पाहिले जाते आणि हा एक संसर्गजन्य आजार आहे. याची प्रमुख लक्षणे जसे की डोळ्याचा पांढरा भाग लालसर होणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यात जळजळ होणे, म्युकस निघणे, दृष्टिक्षेपात अडचण निर्माण होणे, प्रकाशाची संवेदनशीलता, पापण्या सुजणे इत्यादी. याचे मुख्य कारण म्हणजे काही बॅक्टरीया किंवा वायरस मुळे हा आजार होतो. काहीवेळेला डोळ्यांचे सौंदर्य प्रसाधने वापरल्यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो.

याचे निदान आणि उपचार करण्यासाठी याची चिन्हे, लक्षणे, हा आजार किती दिवस होता हे सर्व बघून डॉक्टर्स उपचार करतात. डोळे तपासताना डोळ्यांच्या बाहेरचा आणि आतील भाग नीट तपासले जातात. हा आजार साधारणपणे चार आठवड्यापेक्षा कमी राहतो. डोळे येणे याचा उपचार कारणांवर अवलंबून असतो. यावर आरामासाठी थंड पट्ट्या आणि कृत्रिम अश्रूंचा वापर केला जातो. हा आजार आपल्या निकटवर्तीयांना होऊ नये म्हणून डोळ्यांना हात लावू नये, हात स्वच्छ धुवावे .

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Heath Title: Conjunctivitis symptoms in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x