26 January 2022 10:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | काल 1 दिवसात या 10 पेनी शेअर्समधून तब्बल 10 टक्क्यांपर्यंत कमाई | यादी सेव्ह करा PPF Investment | या सरकारी योजनेत दररोज इतके पैसे जमा करून कोटीचा निधी जमा होईल | जाणून घ्या माहिती Cryptocurrency Investment | क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीपूर्वी या गोष्टी नक्की तपासा | गुंतवणूक सुरक्षित आणि नफ्यात राहील Stock To BUY | मोठ्या नफ्यासाठी मल्टिबॅगर स्टॉक निओजेन केमिकल्स खरेदी करा | HDFC सिक्युरिटीजचा सल्ला Daily Rashi Bhavishya | 26 जानेवारी 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल 2022 Honda CBR650R | होंडा CBR650R 2022 भारतात लॉन्च | बुकिंग शुरू | वैशिष्ट्ये जाणून घ्या Gold Silver Prices Today | आज पुन्हा सोनं महागलं, पण चांदीचे दर घसरले | जाणून घ्या ताजी किंमत
x

आधार कार्डावरील तुमचा फोटो भयंकर दिसतोय? | फोटो बदलण्यासाठी काय करावं त्यासाठी वाचा

How to update Aadhar Card photo

नवी दिल्ली, १२ ऑगस्ट | UIDAI यापूर्वी आधार क्रमांकावर नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक बदलण्यासोबत फोटोग्राफही ऑनलाईन अपडेट करण्याची सुविधा मिळत होती. परंतु काही दिवसांपूर्वी UIDAI नं घसबसल्या पत्ता बदलण्याची देण्यात आलेली सेवा बंद केली होती. तसंच पुढील आदेश येईपर्यंत ही सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचं आधारनं सांगितलं होतं.

त्यामुळे आता नाव, मोबाईल क्रमांक, जन्म तारीख, ईमेल आयडी, पत्ता आणि फोटो बदलण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन प्रक्रियेचाच वापर करावा लागणार आहे. जर तुम्हाला आधार कार्डावरील तुमचा फोटो बदलायचा असेल तर तुम्हाला तुमच्या नजीकच्या आधार केद्रात जाऊन त्यासाठी फॉर्म भरून द्यावा लागेल.

यासाठी तुम्हाला आधार कार्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या Get Aadhaar सेक्शनमधून आधार नामांकन/अपडेट फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. हा फॉर्म योग्यरित्या भरून तो आधार केंद्रात न्यावा लागेल. त्यानंतर आधार केंद्रात तुमच्या फिंगरप्रिन्ट्स, रॅटिना स्कॅन आणि फोटोग्राफ पुन्हा कॅप्चर केले जातील.

तसेच नवं आधार कार्ड तयार करायचं असल्यास त्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. परंतु आधार कार्डावर माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला ५० रूपये शुल्कही जमा करावं लागेल. या क्रमांकाच्या माध्यमातून तुम्ही आपला अर्ज ऑनलाईन ट्रॅक करू शकता. यानंतर अपडेटेड फोटोसह तुम्हाला आधार कार्ड मिळण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी लागेल.

जर तुम्हाला आधार कार्डाच्या सेवा केंद्रात जायचं नसेल तर UIDAI च्या क्षेत्रीय कार्यालयाला पत्र लिहूनही तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला UIDAI च्या पोर्टलवर जाऊन ‘Aadhaar Card Update Correction’ फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. त्यात विचारलेल्या सर्व गोष्टीही भराव्या लागतील.

या नंतर UIDAI च्या कार्यालयाच्या नावे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक पत्र लिहावं लागेल. त्यानंतर आपला सेल्फ अटेस्टेड फोटो सही करून अटॅच करा. फॉर्म आणि पत्र दोन्ही UIDAI च्या कार्यालयात पोस्टाद्वारे पाठवा. दोन आठवड्यांमध्ये तुम्हाला तुमचं नवं आधारकार्ड प्राप्त होईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to update Aadhar Card photo in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Aadhar Card(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x